अपयशाने खचून जाऊ नका

डॉ. संदीप भाजीभाकरे
अपयशाने खचून जाऊ नका
डॉ. संदीप भाजीभाकरे

मुंबई,ता. ०६ : कोणत्याही अपयशाने खचून जायचे नसते.अपयशाचा अनुभव घेउम नव्याने धडक मारायची असते. आपल्या वंशजांनी अनेक संकटाला तोंड देत यश संपादन केले.त्यांचेच आपण लढवय्ये वंशज आहोत हे विसरू नका.पुन्हा प्रयत्न करा,तुम्हाला यश नक्की मिळेल असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी व्यक्त केले. सकाळ माध्यम समूहाच्या 'यिन मंत्रिमंडळाच्या' पहिल्या बैठकीला ते प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.

प्रत्येक व्यक्तीकडे स्वतची एक सुप्त शक्ती असते.ती ओळखा , तीच आपली प्रेरणा आहे.आपल्याला दोन-तीन वेळा अपयश आले तर खचून जाऊ नका,मला ही आयुष्यात अपयश आले. पण मी त्यामुळे नैराश्यात न जातो पुन्हा जोमाने कामाला लागलो.त्यामुळे प्रत्येकाने अपयशाची पर्वा न करता पुन्हा धडक देऊन यश संपादन केले पाहिजे .

कुठल्याही परिस्थितीला घाबरण्याचे कारण नाही बिनधास्त जगले पाहिजे. चुका झाल्या तरी घाबरायचं नाही. जे करायचे ते खणखणीत पणे करायचे.आत्मविश्वास कमी करणारी भरपूर लोक आहेत.त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.नवीन मार्ग शोधणे गरजेचे आहे.उगीच जगायचं म्हणून जगू नका. जे काय कराल ते विचारपूर्वक करा. प्रथा , परंपरा , जात ,धर्म याकडे बघू नका.आपल्या बुद्धीला पटेल ते करा.तुम्हाला यश नक्की मिळेल.

तरुणांमध्ये प्रचंड शक्ती आहे जोश आहे. पण अभ्यास करणे हे आपले कर्तव्य आहे हे विसरू नका. राजकारण ज्यांना आवडते तर त्यांनी त्यात बिनधास्त जा.राजकारणात नेतृत्व गुणांना महत्व आहे.ते ओळखा. त्यांना इतर क्षेत्रात जायचे असेल त्यांनी तेथे जा. ते ही महत्त्वाचे आहे.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ही दिलखुलास उत्तरे दिली. आयुष्यातील महत्वाचा क्षण कोणता ? आपल्याला जे व्हायचे आहे ते कसे ठरवायचे ? भ्रष्ट्राचारची अडचण होते का? या प्रश्नावर त्यांनी दिलखुलास उत्तर देताना म्हटले की,मनातील ठाम निग्रह महत्वाचा आहे. तो असल्यास कोटीही अडचण भासत नाही. किंबहुना त्याच्यावर मार्ग हा सापडतोच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com