esakal | शिक्षण आता मातृभाषेतूनच !
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra

शिक्षण आता मातृभाषेतूनच

sakal_logo
By
टीम YIN युवा

जालना : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या द्रुष्टीने अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतनचे शिक्षण सेमी इंग्रजी (Semi English), इंग्रजी माध्यम (English medium) आणि मातृभाषेत (Mother tongue) घेता येणार आहे. इंग्रजीच्या (English) भीतीमुळे अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्याना (Student) यानिमित्ताने दिलासा मिळेल. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून अभियांत्रिकीसह, तंत्रनिकेतन (पॉलटेक्निक) अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण (Education)घेता येणार असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पट्टलवार (Prashant Pattalwar) यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारीआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अंबड येथील प्राचार्य प्रा. आदेश जिंतूरकर, डॉ. मंगेश वाघमारे, प्रा. विजय कुमार बुक्का, यांची प्रमुख उपस्थिती होती.

तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया दरम्यान विद्यार्थ्यांना पर्याय दिला जाणार असून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता सध्याच्या प्रचलित पाठक्रम, प्रश्नपत्रिका इंग्रजीमधेच राहतील, मात्र विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये द्विभाषिक उत्तरे लिहण्याची मुभा दिली जाणार आहे.

हेही वाचा: विलगीकरण कक्षासाठी तंत्रनिकेतन वसतीगृह घेतले ताब्यात

तसेच तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया बाबत माहिती देताना प्रा. पट्टलवार म्हणाले की, जालना जिल्ह्यात दोन तंत्रनिकेतन महाविद्यालय असल्याने एमआयडीसी आणि कंपन्याला लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील दोन्ही महाविद्यलयात स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक, रसायन अभियांत्रिकी यासह इतर अभ्यासक्रमाच्या एकूण ४५० प्रवेश क्षमता आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अल्पसंख्याक संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना आहे. तसेच तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी शासनाने ३ सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्राचार्य जिंतूरकर म्हणाले की, जिल्ह्यातील शाळेत भेटी देऊन तंत्रनिकेतनचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे. रोजगारक्षम अभ्यासक्रम आणि सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असल्याने विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्राध्यान दिले पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

loading image
go to top