esakal | थुंकी मुक्त भारतासाठी सरसावले तरुणाईचे हात!
sakal

बोलून बातमी शोधा

थुंकी मुक्त भारतासाठी सरसावले तरुणाईचे हात!

थुंकी मुक्त भारतासाठी सरसावले तरुणाईचे हात!

sakal_logo
By
टीम YIN युवा

संबंध फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 ते 2020 या एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण भारत देशात 'थुंकी मुक्त भारत' या मोहिम राबवण्यात आली. यामध्ये आधी प्रत्येक महाविद्यालयामधील 2 मुलांची निवड आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारीची देखील निवड करून या मोहिमेत नागपूर विद्यापीठाच्या सभागृहात उपस्थित सर्व महाविद्यालयातील मुले आणि कार्यक्रम अधिकारी यांना सर्वांत आधी थुंकी मुक्त भारत अभियानाबद्दल संपूर्ण माहिती देऊन त्यांना या अभियानाअंतर्गत प्रशिक्षण देखील देण्यात आले.

हेही वाचा: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग: ऑटोमेशन क्षेत्रातील सुसंधी

आणि सर्व महाविद्यालयांना त्यांच्या त्यांच्या महाविद्यालयची लिंक बनवून देण्यात आली. आणि त्यांना सोशल मीडियाद्वारे पोस्टर बनवून, व्हिडियो बनवून वा इतर माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणे, लोकांना तंबाखू, सिगारेट आणि इतर व्यसनी वस्तूंपासून लोकांना व मुलांना व महिलांमधे जनजागृती करून त्यांना समजावून सांगितले की या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या जीवनाला किती धोका होऊ शकतो आणि त्यांच्या परिवारालादेखील भोगावं लागू शकतं. हे अभियान महाविद्यालय आणि विद्यापीठापर्यंतच मर्यादित नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत भर राबविण्यात आलेला आहे.

हेही वाचा: आरोग्य मनाचे

आणि ज्यांनी ज्यांनी सेंट्रल लेवल ला अतिशय उत्तम पद्धतीने कार्य केले त्याना देखील केंद्र सरकार ने देखील सन्मानित केले, तसेच महाविद्यालय स्तर व विद्यपिठ स्तर, आणि राज्य स्तर इत्यादी स्तरावर ज्या-ज्या महाविद्यालयांनी अतिशय उत्तम पध्दतीने कार्य केले त्यांना संबंध फाउंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपुर च्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूरच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना ब्राँझ मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले. यात डॉ. राजकुमारगिरी गोसावी (प्रोग्राम ऑफिसर), विनोद हजारे (टोबॅको कंट्रोल लीडर) आणि यश कांबळे (सोशल मीडिया लीडर) यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या देशाला थुंकी मुक्त करण्यासाठी सोशल मीडिया द्वारे विविध प्रकारचे पोस्टर्स व व्हिडिओज बनवून देशातील जनतेला आव्हान करण्यात आले.

loading image