व्यवसाय करायचा असेल, तर त्या क्षेत्राचा प्रचंड अभ्यास करा लाडाची कुल्फीचे प्रमुख राहुल पापळ यांचे मार्गदर्शन.

व्यवसाय करायचा असेल, तर त्या क्षेत्राचा प्रचंड अभ्यास करा लाडाची कुल्फीचे प्रमुख राहुल पापळ यांचे मार्गदर्शन.

मुंबई, ता. ७ : आयुष्यात उद्योजक अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अगोदर आई-वडिलांना सांभाळा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, अथवा ज्या क्षेत्रात जाणार त्या क्षेत्राचा प्रचंड अभ्यास करा, त्याचा शोध घ्या. त्याची सुरुवात कुठून झाली, त्याची माहिती घ्या आणि गणिते बांधा. शिवाय हे सर्व करत असताना तुमचे आरोग्य चांगले ठेवा. व्यवसाय करणे खूप सोपे आहे. बाहेरचे खाऊ नका. ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा मंत्र कायमच लक्षात ठेवून आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या, असे मार्गदर्शन लाडाची कुल्फीचे प्रमुख व आर. एस. पापळ मार्केटिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राहुल पापळ यांनी केले.

मात्र आज मी माझ्या करिअरमध्ये एका मोठ्या उंचीवर आहे. मी आठवीत नापास होतो, हे सांगितल्यास अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे शाळेचा दाखला घेऊनच फिरत असतो. गुजराती व्यापाऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मी सतत शिकण्याची भूमिका घेतली. माणसांकडून शिकत राहिलो. त्यांच्याकडून चांगले घेत राहिलो. मला माझ्या व्यवसायात आईचा खूप पाठिंबा मिळाला. आईचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. त्यातूनच मी लाडाच्या कुल्फीचा ब्रँड काढला. आज कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये ५८० ‘लाडाच्या कुल्फी’च्या शाखा आहेत. भारतात कुल्फीचा हा सर्वात मोठा ब्रँड आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांच्याकडून शिकलो. त्यामुळे आपले आयडॉल बदलले की यशाचे मार्ग निर्माण होतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून घ्या. त्यांचे कार्य लक्षात घ्या. पन्नास वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य लक्षात घेता ते किती मोठे होते, हे लक्षात येते. ते माझ्यासाठी आदर्श असल्याचेही पापळ यांनी सांगितले.

तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे...

आपण आपला वेळ किती वाया घालवतो, याचे गणित ठरले पाहिजे. आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका, गणपती मंडळे, जयंती, आयपीएलच्या स्पर्धा यात गुंतून असतो; परंतु व्यवहाराकडे लक्ष देत नाही. आपण मार्केटचा अभ्यास करत नाही. उत्पादन केल्यानंतर त्याची किमत वाढत असते. पुढे दहा वर्षांत खूप मोठे बदल होतील. विविध तंत्रज्ञानामुळे जग खूप बदलणार आहे. भविष्यात नोकऱ्या नसतील. त्यामुळे भविष्याचा वेध घ्यावा, असे आवाहनही राहुल पापळ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com