लग्नाची गोष्ट : अपोझिट पोल्स ॲट्रॅक्ट्स 

कार्तिकी गायकवाड, रोनित पिसे
Thursday, 18 February 2021

काही वर्षांपूर्वी ‘सा रे ग म प’च्या लिट्ल चॅम्प्स या पर्वाची विजेती ठरत आपल्या घराघरांत पोचलेली सर्वांची लाडकी कार्तिकी गायकवाड नुकतीच सौ. कार्तिकी पिसे झाली. दोन महिन्यांपूर्वीच तिनं रोनित पिसे याच्याशी लग्नगाठ बांधली. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून, त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे.

काही वर्षांपूर्वी ‘सा रे ग म प’च्या लिट्ल चॅम्प्स या पर्वाची विजेती ठरत आपल्या घराघरांत पोचलेली सर्वांची लाडकी कार्तिकी गायकवाड नुकतीच सौ. कार्तिकी पिसे झाली. दोन महिन्यांपूर्वीच तिनं रोनित पिसे याच्याशी लग्नगाठ बांधली. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून, त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. कार्तिकी आणि रोनितचं ॲरेंज मॅरेज आहे. कार्तिकीचे वडील आणि रोनितची आई यांची खूप जुनी ओळख. रोनितच्या आईनं रोनितची पत्रिका कार्तिकीच्या वडिलांना देत तुमच्या ओळखीत कोणी मुलगी आहे का, असं विचारलं होतं. काही दिवसांनी कार्तिकीच्या वडिलांनी रोनितसाठी कार्तिकीचंच नाव सुचवलं आणि रोनितनं आनंदानं कार्तिकीच्या नावाला होकार दिला. कार्तिकीचे वडील आणि रोनितची आई यांची जुनी ओळख असली, तरी कार्तिकी आणि रोनितची पहिली भेट ही लग्न ठरण्याच्या वेळीच झाली. 

कार्तिकी रोनितबद्दल बोलताना म्हणाली, ‘‘रोनित खूप समजूतदार आहे. समोरच्याचं पूर्ण म्हणणं शांतपणे ऐकून मग तो आपलं मत मांडतो. समोर कोणीही असो; त्याला आदर देणं, नम्रपणे बोलणं हे त्याच्यातलं गुण मला आवडतात. तो एखाद्या गोष्टीवर चिडलाय असं अगदी क्वचितच होतं. याशिवाय मला त्याची आवडणारी गोष्ट म्हणजे तो एक फॅमिली पर्सन आहे. आपल्या कुटुंबाला वेळ देणं, आपल्या आई बाबांना मदत करणं या गोष्टी तो नेहमीच करतो. आतापर्यंत तो मलाही माझ्या कामात कायम सपोर्ट करत आला आहे. तो खूप फिटनेस फ्रिक आहे. रोजच्या रोज न चुकता जिममध्ये जाऊन व्यायाम करणं, योग्य तो आहार घेणं, वेळच्या वेळी जेवणं हे तो न चुकता करतो आणि याबाबतीतलं त्याचं डेडीकेशन मला 
आत्मसात करायला आवडेल.’

तर, रोनितनं कार्तिकीविषयी सांगितलं, ‘कार्तिकी अतिशय गोड मुलगी आहे. आमचं लग्न होऊन आत्ता दोन महिनेच झालेत, पण इतक्या कमी वेळात ती खूप कंफर्टेबल झाली आहे आमच्या कुटुंबात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे तिच्यात असलेला मनमिळाऊपणा. कार्तिकीला ती लहान असल्यापासूनच आपण सगळे पाहात आलो आहोत, तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे, लोकं भरभरून कौतुक करतात. पण हे सर्व ती प्रॅक्टिकल लेव्हलवर सांभाळत्येय.

कार्तिकी खूप डाऊन टू अर्थ आहे. एक मुलगी म्हणून, सून म्हणून, बायको म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या ती उत्तमप्रकारे पार पाडत आहे. आमचं लग्न ठरलं तेव्हाच खरं तर आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. त्याआधी आम्हीसुद्धा तिला लिट्ल चॅम्प्सपासून बघत आलो आहोत. तिनं एखादं नवीन गाणं गायलं तर तेही मी त्या त्या वेळी ऐकलं आहे. मी लहानपणी तबला शिकायचो आणि तीही लहानपणापासूनच गाते. त्यामुळं गाणं हाच आमच्यातला सामान धागा आहे. याव्यतिरिक्त आम्ही एकमेकांपेक्षा अगदी वेगळे आहोत, आमच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. त्यामुळं ‘अपोझिट पोल्स अट्रॅक्ट्स इच अदर’ हा नियम आमच्याबाबतीत अगदी बरोबर लागू पडतो.’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage Story of Kartiki Gaikwad and Ronit Pise