esakal | ऊर्जा मनातली
sakal

बोलून बातमी शोधा

power

ऊर्जा मनातली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ऊर्जा म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा ही सदैव स्थिर असते व ती निर्माण व नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. ऊर्जेचे तीन प्रकार आहेत : स्थितिज(potential energy), गतिज (kinetic energy) आणि अंतर्गत (Internal energy)

डोंगरमाथ्यावरील तलावातील पाण्यात (स्थितिज, स्थितीमुळे प्राप्त झालेली) ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा उपयोग करून डोंगराच्या पायथ्याशी ठेवलेले टरबाइन (वक्र पाती असलेले चक्र) फिरवून यांत्रिक कार्य घडविता येते. ताणलेल्या किंवा संकोचित मळसूत्री स्प्रिंगमध्ये यांत्रिक ऊर्जा साठविलेली असते कारण तिच्यावरील बंधन जाताच ती पूर्वस्थितीत येताना यांत्रिक कार्य करू शकते. विद्युत् भारित धारित्रात (विद्युत् भार साठविणाऱ्या साधनात) विद्युत् ऊर्जा असते. बंदुकीच्या दारूतही सुप्त रासायनिक ऊर्जा असते.

पृथ्वीच्या पोटात कल्पनातीत ऊष्मीय ऊर्जा आहे. कधीकधी ऊर्जेची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात;-'एखाद्या वस्तूने अगर संहतीने (वस्तूंच्या समुदायाने) दुसऱ्या वस्तूला अगर संहतीला कार्य समर्पण केले असता पहिल्या वस्तूच्या अगर संहतीच्या ज्या गुणधर्मात तितक्याच कार्याची घट होते त्या गुणधर्मास ऊर्जा म्हणतात'.

हेही वाचा: सी.ओ.ई.पी. एन.एस.एस. द्वारे वृक्षारोपण मोहीम

ऊर्जेला दिशा नसते.ऊर्जेचे वैशिष्ट्य असे आहे की, ती आपणास उत्पन्न करता येत नाही किंवा तिचा नाशही करता येत नाही. आपणास फक्त तिचे रूप बदलता येते. या विधानालाच ऊर्जेच्या अक्षय्यतेचा सिद्धांत म्हणतात.

निळ्या रंगात ऊर्जा जास्त असते आणि तांबड्या रंगात कमी असते. एंट्रॉपी म्हणजे ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होत असताना उपयोगात न येऊ शकलेली ऊर्जा. उष्णता, प्रकाश किंवा वीज हे उर्जेचे प्रकार आहेत. रेणूंची गती वाढली म्हणजे रेणूंची गतीज ऊर्जा वाढते. ऊर्जेलाही वस्तुमान असते.

हेही वाचा: लईभारी! ग्रामीण भागातील अनिकेतचं थेट अमेरिकेतून कौतुक

उर्जा ही माणसाच्या जीवनात एक क्रांतीची गोष्ट आहे. परंतु मानव हा या उर्जेचा दुरुपयोग करत आहे. ही चराचर सृष्टी , प्रत्येक सजीव एकाच ऊर्जेने , चैतन्याने बनलेले आहेत. हे सर्व मान्य आहेच.ही ऊर्जा तुमचा श्वास,प्राण, बुद्धिमत्ता , तुमच्या पंचेंद्रियांची क्षमता आणी तुमचे मन या मध्ये कार्यरत असते .प्रत्येक सजीव ही ऊर्जा कशी वापरतो हे महत्वाचे आहे.

प्रत्येक माणूस एक ध्येय घेऊन जन्माला येतो म्हणजे जन्माला आला, वाढला, शिकला , नोकरी,लग्न ,वंशवृद्धी करून पुढच्या प्रवासाला गेला.... अस होत नसतं, तर प्रत्येकाचे काही जीवित कार्य असते, पण बरेचदा आपल्या मनावर ,शरीरावर आणि बुद्धीवर कौटुंबिक ,सामाजिक आणि बाह्य संस्कार इतके होतात की आपल्याला आपल्या स्वतःची जाणीव होत नाही.

हेही वाचा: नाशिकमध्ये सामाजिक उपक्रमांतून यिनचा 7 वा वर्धापनदिन साजरा

आपण आपल्या मनात अनेक प्रकारच्या उपयोगी नसलेल्या घटना,गोष्टी आणि प्रसंग साठवून ठेवतो जे आपल्या सुप्त मनात कोरले जातात अगदी स्थितिज उर्जे सारखे आणि मनुष्यचा चौकस स्वभाव ज्या मुळे आजूबाजूला काय चाललंय याची माहिती घ्यायची जी बरेचदा निरुपयोगी असते आणी ती आपल्या मनात साठवली जाते. आपल्याला नेहेमी याचा उपयोग होईल अस नाही काही वेळा अशा माहिती मुळे नैराश्य ही येऊ शकते.

मनातला हा कल्लोळ वेळीच बाहेर काढायला हवा म्हणजेच नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेत हस्तांतरित करायला हवी.

सध्याचा काळात कौटुंबक कलह/ताणतणाव खूप वाढले आहेत ज्या मुळे नैराश्य येत आणि ते मनात साठत गेला कि काय होता ते वेगळा सांगायला नको..... त्या साठी उर्जेच्या अक्षयतेचा नियम वापरून एका प्रकारची ऊर्जा दुसऱ्या रूपात बदलून घेता यायला हवी नाही का.... म्हणजे सर्व कस सोप होईल

माणूस हा अगदी लहानपणापासून पंचेंद्रियांनी दिलेली माहिती सुप्त मनात दडवून ठेवत असतो. जसं वय वाढत जात तशी विचारांमध्ये प्रगल्भता येत जाते आणि काय करायच काय नाही करायच हे ठरवता येत आणि आपल मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यात मदत होते कारण त्या व्यक्तीला स्वत्वाची जाणीव होते. ह्याचाच अर्थ असा की अंतर्गत ऊर्जा जागृत होते म्हणजेच स्थितिज ऊर्जेच अंतर्गत ऊर्जेत रूपांतर होतं. आपला आनंद आणि आरोग्य कशात आहे हे समजत जात.

हेही वाचा: तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवणे काळाची गरज

वस्तू , माणसं , नाती , प्रेम सगळं या क्षणी पाहिजे नाहीतर नैराश्य येत... अशी एक ना अनेक कारणं आहेत... अशा वेळी स्वतः बद्दलची नकारात्मक भावना वाढत जाऊ शकते आणि परिणामी मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येत हे आपल्याला समजत नाही.

अतिशय मौल्यवान असलेली आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा आपण कशी वापरतो हे महत्वाचे आहे. आपल्या मनाचा , विचारांचा आपल्या शरीरावर खोलवर परिणाम होत असतो. जर मनाला सकारात्मक विचार करायची सवय लावली तर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते.

माझी ऊर्जा मी योग्य ठिकाणी वापरेन असा संकल्प करून कृती केली तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभेल, आणि ऊर्जा सकारात्मक करण्याचा कानमंत्र म्हणजे ऊर्जा निर्माण व नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते म्हणून नकारात्मक ऊर्जा सकारत्मक करणे श्रेयस्कर ठरते!

Hard Work transforms Dreams into reality!!!

- प्रा. गायत्री श्रोत्रीय सहायक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड- पुणे

loading image
go to top