esakal | तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवणे काळाची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Youth

तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवणे काळाची गरज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच थांबवणे काळाची गरज आहे. होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य तर अंधारात ढकलतातच आणि त्याबरोबर एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्नदेखील विरून जाते.

मुलांना व्यसन कसे जडते?

आजूबाजूचे वातावरण, घरातील एखाद्या व्यक्तीला बघून, मित्रांबरोबर केवळ मजा करण्यासाठी, एकदा अनुभव घेऊन बघू असा विचार करून, कुतूहल म्हणून अशी एक ना अनेक कारणं व्यसन जडण्यापाठीमागे असू शकतात. पालक म्हणून आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे. मुलांमध्ये व्यसनांची सुरुवात साधारणत: पौगंडावस्थेतच होते. त्याचवेळी त्याला व्यसनाच्या बाबतीत अटकाव झाला तर मग तो भविष्यात शक्यतो कोणत्याही व्यसनाच्या आहारी जात नाही.

हेही वाचा: 'आजादी का अमृत महोत्सव'; पुण्यात ७८वा क्रांती दिन उत्साहात साजरा

कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईटच असते. बऱ्याच वेळा व्यसन हे जवळच्या व्यक्तीकडूनच लागण्याची शक्यता जास्त असते. घरातील व्यक्तीला व्यसन असल्यास त्याचा परिणामही मुलांवर होतो. जेव्हा मुले लहान असतात तेव्हा त्यांना एवढी समज नसते. तुमच्या व्यसनाचा आजूबाजूच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, सिनेमा, मालिका, नाटक आदी मनोरंजनपर कार्यक्रमांमध्ये मद्यपान, धू्म्रपान या गोष्टी फार सामान्य असल्याचे दाखवण्यात येते. याकडे पाहूनही आजची पिढी व्यसनाधीन होत असल्याचे दिसून येत आहे.

आपले जीवन आपण कशाचा आहारी जाऊन का वाया घालवायचे? काही क्षणांच्या फसव्या सुखासाठी आपण आपले जीवन तर पणाला लावत नाही ना? याचा विचार करायला हवा. व्यसनासाठी वेळ, पैसे, आरोग्य सर्व काही पणाला लावणे खरंच योग्य आहे का? हा प्रश्न पडायलाच हवा. माणसांसाठी वेळ खूप मौल्यवान आहे. चला तर संकल्प करूयात, आपल्या पुढच्या पिढीला व्यसन मुक्त करूयात.

हेही वाचा: नाशिकमध्ये सामाजिक उपक्रमांतून यिनचा 7 वा वर्धापनदिन साजरा

व्यसनांचे भीषण वास्तव :

1. भारतातील मनोरुग्णांत ६०टक्के मनोरुग्ण दारुच्या आहारी गेल्यामुळे झाले आहेत.

2. जगामध्ये प्रतिवर्षी अंदाजे दशलक्ष नवीन कर्करोगग्रस्त रुग्णांचे निदान, त्यामध्ये ६ दशलक्ष पेक्षाही अधिक मृत्यु होतात.

3. देशातील एकूण् कर्करोगाच्या प्रमाणापैकी ३४% कर्करोग तंबाखूमुळे होतात.

4. चोऱ्या, दरोडे आणि बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे नशेच्या अधीन गेल्यामुळे होतात.

5. घरगुती हिंसाचाराचे प्रमुख कारण व्यसन आहे.

6. रस्त्यांवर होणारे अनेक अपघात व्यसनाधीन असल्यानेच होतात.

7. धूम्रपान केल्याने हृदयरोग, कॅन्सर आणि फुफ्फुसांचे आजार अशा गंभीर समस्या उद्भवतात.

8. धुम्रपानामुळे फुफ्फुस, स्वरयंत्र्, अन्ननलिका व श्वसनलिकेचा कर्करोग होतो.

9. धुम्रपान स्वादुपिंड, मूत्राशय, मुत्रपिंड, मुत्रनलिका, प्लिहा व गर्भाशय मुखकर्करोग होण्यासही कारणीभूत.

हेही वाचा: लईभारी! ग्रामीण भागातील अनिकेतचं थेट अमेरिकेतून कौतुक

व्यसनापासून दूर राहण्यासाठी अवलंबावेत वेगवेगळे उपाय

1.आत्मविश्वासाने व्यसनापासून मुक्ती मिळवता येते.

2.व्यसनाच्या आग्रहाला नकार देण्यास शिका.

3.व्यसन करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा.

4.व्यसनाऐवजी संगीत, पुस्तकं वाचण्याचा आणि खेळ खेळण्याचा पर्याय निवडा.

5.प्रिय व्यक्तींबरोबर वेळ घालण्यावर भर द्यावा.

लेखकाचे नाव : श्री सोमनाथ गिते

मोबाईल नंबर ९९७०३८७०३८

ई-मेल आयडी : somnath.gite@gmail.com

पत्ता : सी-५०६ चिंतामणी गार्डन आंबेगाव पुणे – ४११०४६

loading image
go to top