
जॅग्वार, ऑडी यांसारख्या लक्झरियस कार कंपन्यांनी आपली नवनवीन; तसेच फेसलिफ्ट मॉडेल नुकतीच भारतीय बाजारात आणली आहेत. इतर भारतीय कार कंपन्यांबरोबरच या लक्झरियस कारनाही भारतात मोठा ग्राहक/चाहता वर्ग आहे.
जॅग्वार, ऑडी यांसारख्या लक्झरियस कार कंपन्यांनी आपली नवनवीन; तसेच फेसलिफ्ट मॉडेल नुकतीच भारतीय बाजारात आणली आहेत. इतर भारतीय कार कंपन्यांबरोबरच या लक्झरियस कारनाही भारतात मोठा ग्राहक/चाहता वर्ग आहे. त्याच अनुषंगाने या कार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नवे पर्याय आकर्षक फीचर्स, अंतर्गत-बाह्य बदलांसह बाजारात आणले आहेत. याचाच आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जॅग्वार इलेक्ट्रिक ‘आय-पेस’
लक्झरियस आणि तेवढ्याच किमती कारसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जॅग्वार लँड रोव्हर (Jaguar and Landrover - JLR) कार कंपनीने इलेक्ट्रिक ‘आय-पेस’ची (I-Pace) भारतात घोषणा केली. एसयूव्ही श्रेणीतील ही कार जग्वार लँड रोव्हरकडून भारतामध्ये सादर झालेली पहिली इलेक्ट्रिक कार ठरली आहे. आय-पेस अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानांचा वापर करून डिझाईन करण्यात आली आहे. आय-पेसमध्ये ९० केडब्ल्यूएच क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय २९४ केडब्ल्यू पॉवर आणि ६९६ एनएम टॉर्क देण्यात आल्याने ती ०-१०० किलोमीटर प्रतितास वेग ४.८ सेकंदांमध्ये घेते.
स्पेसिफिकेशन
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑडी ‘एस ५’ स्पोर्टबॅक
जर्मन लक्झरी कारनिर्माती कंपनी ऑडीने (Audi) फेसलिफ्ट ‘एस ५’ स्पोर्टबॅक (Audi S-5 sportback )ही सेदान प्रकारातील दुसरी नवी कार भारतात यंदा सादर केली. यापूर्वी २०१७ मध्ये ही कार लाँच झाली होती. एस ५ स्पोर्टबॅकमध्ये ३५४ एचपी क्षमतेचे ३.० लिटर ‘टीएफएसआय’ पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे ५०० एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार ० ते १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग ४.८ सेकंदामध्ये गाठते. या कारमध्ये १२.३ इंचीचा व्हर्च्युअल कॉकपीट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन
Edited By - Prashant Patil