झूम : डॅशिंग, दमदार, रुबाबदार...

Bike
Bike

भारतातील वाहन उद्योगासाठी गेली दोन वर्षे आव्हानात्मक ठरली. वाहन कंपन्यांनी मंदीचा धसका घेत मोजक्याच नवीन दुचाकी व त्यांचे सुधारित व्हर्जन बाजारात आणले. कोरोनाचा फटका बसलेल्या वाहन उद्योगाने 2021 मध्ये भरारी घेण्याच्या दृष्टीने नवीन आणि अपग्रेड केलेल्या कारसोबत दुचाकीही बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. रॉयल एन्फिल्डची मेटिऑर 350, जावा 42 स्ट्रीट रेसर 2.1, होंडा सीबी 350 आरएस स्क्रँबलर या दमदार दुचाकी बाजारात आल्या आहेत. जाणून घेऊयात या दुचाकींविषयी...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जावा 2.1
जावा कंपनीने 42 सेगमेंटमध्ये 2.1 हे मॉडेल फेब्रुवारीच्या सुरुवातीला बाजारात आणले. यात जावा आणि 4.2 उत्पादन श्रेणी तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात आली आहे. नव्या कोऱ्या क्रॉसपोर्ट इंजिनसह जावा 2.1 मध्ये ग्राहकांना आकर्षित करणारी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. लांब सीटमुळे आरामदायी प्रवासाचा आनंद घेणे शक्य होते. फ्रेमच्या सेटअपवर नव्याने काम करण्यात  आले असून ग्राऊंड क्लिअरन्सही अधिक आहे. शिवाय ट्विन एक्झॉस्ट, क्वांटिनेंटल एबीएससह उत्तम ब्रेकिंग सिस्टिम दिले आहेत. जावा 42च्या रेंजमध्ये फ्लायस्क्रीन आणि अपडेटेड हेडलॅम्प ग्रील आहेत.

स्पेसिफिकेशन

  • 293 CC लिक्विड कूल्ड, 4-वॉल्व्ह, डीओएचसी इंजिन.
  • 27.33 बीएचपी पॉवर, 27.2 एनएम टॉर्क
  • 6 स्पिड गिअर ट्रान्समिशन, 14 लिटर इंधन क्षमता
  • लांबी 2160 मिलिमीटर, उंची 1090 मिलिमीटर
  • व्हील बेस 1396 मिलिमीटर, ग्राउंड क्लिअरन्स 165 मिलिमीटर
  • किंमत 2 लाख 16 हजार 693/- (मुंबई ऑनरोड)

रॉयल एन्फिल्ड 'मेटिऑर 350'
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रॉयल एनफिल्डची मेटिऑर  (Royal Enfield Meteor 350) भारतात लाँच झाली. मेटिऑर 350 रॉयल एनफिल्डच्या ‘थंडरबर्ड’ची जागा घेऊ शकते. मेटिऑरमध्ये 4 स्ट्रोक, एअर ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. दमदार ब्रेकिंग सिस्टिमसह ड्युअल चॅनल एबीएस कंट्रोल सिस्टमही देण्यात आला आहे. सर्क्युलर एलईडी हेडलॅम्प-टेललॅम्प, टीअर ड्रॉप शेप असलेली इंधन टाकी, डिझायनर सिट मेटिऑरचा लुक आणखी रुबाबदार बनवते. मेटिऑरमध्ये फायरबॉल, स्टेलर, सुपर नोव्हा हे  मॉडेल आहेत. ही दुचाकी फायरबॉल येलो, फायरबॉल रेड आणि सुपरनोव्हा ब्ल्यू रंगांमध्ये उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन

  • 349 CC, एअर कूल्ड, 2 वॉल्व्ह, एसओएचसी इंजिन
  • 20.2 बीएचपी पॉवर, 27 एनएम टॉर्क, 
  • 5 स्पिड गिअर ट्रान्समिशन, 15 लिटर इंधन क्षमता
  • लांबी 2160 मिलिमीटर, उंची 1090 मिलिमीटर
  • व्हिल बेस 1390 मिलिमीटर, ग्राऊंड क्लिअरन्स 170 मिलिमीटर
  • किंमत 2 लाख 28 हजार 12/- (मुंबई ऑनरोड)

होंडा सीबी 350 आरएस स्क्रॅम्बलर
होंडा कंपनीने सप्टेंबर 2020मध्ये भारतात रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी नवीन रेट्रो सिरीजमधील होंडा हायनेस सीबी 350 लाँच केली होती. आता होंडाने CB350 रेंजच्या एक पाऊल पुढे टाकत फेब्रुवारीमध्ये होंडा सीबी 350 आरएस स्क्रॅम्बलर लाँच केली. या दोन्ही मॉडेलचे इंजिन सारखेच असले तरी त्यांची डिझाईन वेगळी आहेत. सीबी आरएसमध्ये युनिट स्लीप अँड असिस्ट क्लचसह एअर कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. एलईडी हेडलाईट, स्विचगिअर, राऊंड रिअर-व्ह्यू मिरर देण्यात आला आहे. सीबी 350 आरएस पर्ल स्पोर्ट्स येलो आणि ब्लॅक रंगात उपलब्ध असेल. 

स्पेसिफिकेशन

  • 348.36 CC, एअर कूल्ड, 2 वॉल्व्ह, एसओएचसी इंजिन
  • 20.7 बीएचपी पॉवर, 30 एनएम टॉर्क, 
  • 5 स्पिड गिअर ट्रान्समिशन, 15 लिटर इंधन क्षमता
  • लांबी 2171 मिलिमीटर, उंची 1097 मिलिमीटर
  • व्हील बेस 1441 मिलिमीटर, ग्राउंड क्लिअरन्स 168 मिलिमीटर
  • किंमत 2 लाख 32 हजार 279/- (मुंबई ऑनरोड)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com