फक्त १० हजारांत बुक करा इलेक्ट्रिक कार; एकदा चार्ज केल्यानंतर धावणार 200Km

Strom R3
Strom R3

इंधनाचे दर दिवसागणिक वाढतच चालले आहे, त्याशिवाय प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेऊन आगामी काळात भारतीयांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीशिवाय पर्याय नाही. किंबहुना पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. या सर्व बाबींना समोर ठेवून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मिताला सुरुवातही केली आहे. पूर्वी महागड्या इलेक्ट्रिक  वाहानामुळे ग्राहक याकडे दुर्लक्षित करायचे. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. इलेक्ट्रिक कंपन्यानी कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. आशातच सोमवारी, एक थ्री व्हीलर इलेक्ट्रिक कार भारतात लाँच झाली आहे. 

मुंबईतील स्टार्टअप कंपनी स्ट्रॉम मोटर्स यांनी सोमवारी आपली मिनी इलेक्ट्रिक कार Strom R3 लाँच केली असून त्यासाठी प्री-बुकिंग सुरुवात केली आहे. ही कार बुक करण्यासाठी आपल्याला १०,००० रुपयांची रक्कम बुकिंग जमा करावी लागेल. मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये या स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कारच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. असे सांगितले जात आहे की ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे. Strom R3 या कारमध्ये दोन सीटर केबिन तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये अनेक सुविधा प्रदान केलेल्या आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 200 किमीपर्यंतचा प्रवास करते तसेच 80kmph च्या टॉप स्पीडने धावू शकते. कंपनीने या कारच्या बॅटरीवर 1 लाख किलोमीटर प्रवास किंवा 3 वर्षांपर्यंतची वॉरंटी दिली आहे. तीन तासांत या कारची बॅटरी 100 टक्के चार्ज होते. 

Strom R3 चं डिझाईन खूपच वेगळं आणि दमदार आहे. दोन दरवाजे आणि तीन चाके असलेली कार आहे. तसेच या कारमध्ये कंपनीने छोटं बोनट, मोठं ब्लॅकआउट ग्रील ज्यामध्ये हेडलाइट्स वाईड एयर ड्रॅम देण्यात आले आहेत. कंपनीने या कारला एलईडी दिवे, ड्युएल टोन आणि सनरूफसह सजवले आहे. ही कार अद्याप बाजारात दाखल झालेली नसून लवकरच ती विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार असून बुकिंग करणाऱ्यांसाठी या कारची डिलिव्हरी सुरु केली जाईल. भारतीय बाजारात या कारची किंमत साडेचार लाख रुपये इतकी आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार,  आतापर्यंत Storm R3 साठी १६५ बुकिंग्स मिळाल्या आहेत. त्यानुसार कंपनीकडे आतापर्यंत ७०५ कोटी रुपयांच्या बुकिंग्स मिळाल्या आहेत.
 

स्वस्तात मस्त Storm R3 या कारसंदर्भातील आधिक माहितीसाठी किंवा कार  बुक करण्यासाठी https://www.strommotors.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com