Blog : हे असे का घडतेयं? आता तरी माणसाने विचार करावा

Blog : हे असे का घडतेयं? आता तरी माणसाने विचार करावा

हल्ली अशा गोष्टी घडत असल्याचे ऐकत आहोत की ज्या अविश्वसनीय आहेत. निसर्गात होणाऱ्या अमुलाग्र बदलांचा थेट प्रभाव मानवी जीवनावर पडत आहे. म्हणजे अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहिल्या तर डोके गरगरायला लागते. पहिली गोष्ट म्हणजे सूर्यमालेतील ऊर्जा देणारा महत्वाचा ग्रह सूर्याची दाहकता काही प्रमाणात कमी झाल्याचा शास्त्रज्ञाचा दावा केला आहे. तर दुसरी गोष्ट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर परिणाम होणे. हे असे का घडत असावे? असा प्रश्न पडायला हवा.

सर्वात मोठा बर्फाचा प्रदेश खंड असणाऱ्या अंटार्क्टिका खंडावर तापमानाने एक महाकाय हिमखंड अंटार्क्टिका खंडापासून वेगळा होऊन त्याचे रूपांतर हळूहळू पाण्यात होत आहे. परिणामी पृथ्वीवरील पाण्याची पातळी वाढवत आहे आणि ही बाब मानवासाठी भविष्यात चिंतेची विषय बनणार आहे. हवामान बदलाला काही अंशी मानवच जबाबदार आहे. कृत्रिमरित्या तयार केलेल्या अनेक वस्तू या हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात तसेच, या सुख-सोयींच्या जीवनासाठी तयार केलेल्या ऐशोआरामाच्या वस्तूंचा उपयोग अति प्रमाणात केलात जात आहे.उदा. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपण सार्वजनिक वाहनाचा उपयोग न करता प्रत्येक व्यक्ती आपले वैयक्तिक वाहन वापरतात. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रदूषण करण्याचे काम करत मानव आहेत.

Blog : हे असे का घडतेयं? आता तरी माणसाने विचार करावा
मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा - रामदास आठवले

निसर्ग वाचवणे ही माणसाची जबाबदारी आहे हे जणू सर्वजण विसरूनच गेलो आहेत. मनुष्य हा पृथ्वीवर मर्यादित कालावधीसाठी आहोत. त्यात अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांना मनुष्य बळी पडत आहे. ते साथीचे रोगही ही मानव निर्मितीच आहेक. मानवाने केलेल्या नवनवीन संशोधनाचे दुष्परिणाम होतात. काही साथीचे रोग हे मानवनिर्मित असतील पण काही नैसर्गिकही असतील. पण त्याला थोडासा तरी आधार हा कदाचित मानव निर्मितीच असू शकतो.

Blog : हे असे का घडतेयं? आता तरी माणसाने विचार करावा
दक्षिण पुण्यात ऐन पावसाळ्यात नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट

प्लेग, स्वाईन फ्लू असे अनेक साथीचे रोग आले पण या संकटावर मानवाने लवकर विजय मिळवला पण, त्याला अपवाद कोविड-19. असाही रोग मानवी जीवनात येऊ शकतो यावर अद्यापही विश्वास बसत नाही. हा साथीचा रोग मानव निर्मित आहे की नैसर्गिक हे अजून सिद्ध व्हायचे आहे. हा साथीचा रोग मानवनिर्मित असल्याचा दावा अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. साथीच्या रोगाने मानवी जनजीव कसे विस्कळीत केले आहे. माणूस माणसाजवळ जाऊ शकत नाही. एकमेकांशी गप्पा मारू शकत नाही. या साथीच्या रोगाची दाहकता इतकी आहे की तो ज्याला जडला त्याची इच्छाशक्ती कमी असेल तर तो या जीवनाचा मुकणार. म्हणूनच मानवाने आता विचार करायला हवा की, असे का घडत असावे?

आणि हे जे घडते आहे ते बदलण्यासाठी मानव जाती म्हणून काय करायला हवे? पृथ्वी मातेला या संकटाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी मानवानेच प्रयत्न करायाला हवेत. शासनामार्फत जे काही पर्यावरण विषयक नियम ठरवून दिले आहेत त्याचे काटेकोरपणाने पालन करावे. पर्यावरण वादी लोकांची भेट घेऊन वातावरणाचा समतोल कसा राखावा यावर चर्चा करावी. महत्वाचे म्हणजे यात युवापिढीने प्रामुख्याने सहभाग नोंदविला पाहिजे.

(लेखक : राहुल गवळी, निफाड महाविद्यालय, नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com