टेक्नोहंट : उत्सुकता ‘ॲण्ड्रॉईड १२’ ची

ऋषिराज तायडे
Thursday, 25 February 2021

अद्ययावत तंत्रज्ञान आणि ग्राहकांना हवे असलेले नवनवीन फीचर्स लक्षात घेता प्रत्येक गॅजेट काळानुरूप बदलत आहे. त्यानुसार बाजारात दाखल होणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानाचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते. त्याप्रमाणेच गुगलही ॲण्ड्रॉईड मालिकेतील १२वा भाग अर्थात ‘ॲण्ड्रॉईड-१२’ लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.​

अद्ययावत तंत्रज्ञान आणि ग्राहकांना हवे असलेले नवनवीन फीचर्स लक्षात घेता प्रत्येक गॅजेट काळानुरूप बदलत आहे. त्यानुसार बाजारात दाखल होणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानाचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते. त्याप्रमाणेच गुगलही ॲण्ड्रॉईड मालिकेतील १२वा भाग अर्थात ‘ॲण्ड्रॉईड-१२’ लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेटा हा सध्या आजच्या तंत्रविश्वातील सर्वांत महत्त्वाचा आणि चर्चेतील विषय. त्याच डेटाच्या पारदर्शकता आणि गोपनीयतेला आणखी महत्त्व देत ॲपलच्या पाठोपाठ गुगलनेही त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार गुगलच्या आगामी ‘ॲण्ड्रॉईड १२’मध्ये वापरकर्त्याला डेटा ट्रान्सपरन्सी आणि डेटा प्रायव्हसी किती नियंत्रणात ठेवायची याबाबत अधिक स्वातंत्र्य दिले जाणार आहे. मात्र, भारतात अद्याप ‘ॲण्ड्रॉईड ११’चा पूर्णपणे वापर सुरू झालेला नसताना ‘ॲण्ड्रॉईड १२’ची घोषणा झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुगलने नुकतेच ‘ॲण्ड्रॉईड १२’चा प्रीव्ह्यू व्हर्जन सादर केला असून, गुगलचे कर्मचारी आणि निवडक वापरकर्त्यांना तो चाचणीसाठी उपलब्ध केला आहे. गुगलच्या Pixel ३,  Pixel ३a,  Pixel ४,  Pixel ४a आणि Pixel ५ मोबाईल असलेल्या निवडक वापरकर्त्यांना त्याची चाचणी करता येत आहे. मात्र, हा प्रीव्ह्यू व्हर्जन असल्याने आणि बीटा व्हर्जन येईपर्यंत वरीलपैकी मोबाईल असलेल्यांनी लगेचच ‘ॲण्ड्रॉईड १२’ न वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये ‘ॲण्ड्रॉईड १२’चे बीटा व्हर्जन आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्णपणे लॉन्च होण्याची शक्यता आहे.

‘ॲण्ड्रॉईड १२’ ची संभाव्य वैशिष्ट्ये

  • एचईव्हीसी (हाय इफिशिएन्सी व्हिडिओ कोडिंग) आणि एचडीआर (हाय डेफिनेशन रिझॉल्युशन) प्रकारात चित्रित केलेले व्हिडिओ आपोआप एव्हीसी (ॲण्डव्हान्स व्हिडिओ कोडिंग) फॉरमॅटमध्ये बदलतील.
  • ॲण्ड्रॉईड १२ मध्ये एव्हीआयएफचा (एव्ही१ इमेज फाइल फॉरमॅट) सपोर्ट उपलब्ध. त्यामुळे जेपीईजीच्या तुलनेत फाईलची साईज न वाढवता फोटोंचा  दर्जा वाढवता येईल.
  • गेमिंगसाठी अद्ययावत एपीआय गेमिंग तंत्रज्ञानामुळे वापरकर्त्यांना खेळताना ब्राईटनेस, आवाज, नोटिफीकेशन सहजपणे कंट्रोल करता येतील.
  • अद्ययावत ऑटो रोटेशन सेटिंगमुळे वापरकर्त्याच्या बैठकीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे आपोआप व्हिडिओ रोटेशन.
  • गोपनीयतेवर अधिक भर देण्यासाठी ‘ॲण्ड्रॉईड १२’मध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोनला प्रसंगी ब्लॉक करण्याची सुविधा.
  • वापरकर्त्यांना मोबाईलचे सिस्टिम अपडेट गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यासाठी गुगल ॲण्ड्रॉईड रनटाइम (एआरटी) प्रणालीचा वापर. त्यासोबतच अन्य मॉड्युल अपडेट्स प्ले-स्टोअरवरही उपलब्ध.
  • Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rushiraj Tayade Writes about Android 12