टेक्नोहंट : कौशल्य करा ‘ॲप’डेट

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. शाळा-महाविद्यालयेही बंद असून, बहुतांश जण सध्या घरीच आहे. त्यामुळे अनेकांकडे सध्या बराच वेळ उपलब्ध आहे.
Technohunt
TechnohuntSakal

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. शाळा-महाविद्यालयेही बंद असून, बहुतांश जण सध्या घरीच आहे. त्यामुळे अनेकांकडे सध्या बराच वेळ उपलब्ध आहे. त्याचाच उपयोग करून आपल्या आवडीचे वेगवेगळे अभ्यासक्रम किंवा कौशल्य विकसित करता येतात. त्याचा फायदा करिअरच्या दृष्टीने निश्चितच होतो. त्यासाठी अनेक संकेतस्थळे किंवा ॲप्स उपलब्ध आहे. त्याबाबत थोडक्यात...

युडेमी

तुमची कौशल्य विकसित करून करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. किंबहुना सध्याच्या लॉकडाउनमध्ये वेगवेगळे कोर्स करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्यासाठी ‘युडेमी’ हा उत्तम पर्याय आहे. वेब डेव्हलपमेन्ट, डेटा सायन्स, ॲडोबे, पायथन यांसारख्या तांत्रिक शिक्षणापासून चित्रकला, फोटोग्राफी, संगीत, योगा, व्यक्तिमत्त्व विकास आदी विविध प्रकारचे अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही सुट्टीचा योग्य वापर करू शकता.

प्रीपबाईट्स

सध्या बाजारपेठेची गरज असलेल्या कौशल्यांबाबत पुरेसा अभ्यासक्रम अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळत नाही. त्यामुळे महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर बहुतांश विद्यार्थी नोकरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करतात. विद्यार्थ्यांची ही गरज प्रीपबाईट्स पूर्ण करते. स्टार्टअप्स, देश-विदेशातील कंपन्यांची सध्याची गरज लक्षात घेता वेगवेगळ्या विषयांतील कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम प्रीपबाईट्सवर उपलब्ध आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान विषयक व्हिडिओ ट्युटोरिअल्स, मॉक टेस्ट, तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध आहेत.

स्टॉकग्रो

हल्ली शेअर बाजाराकडे अनेकांचा कल वाढला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून आर्थिक प्रगती करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहे. मात्र, शेअर बाजारातील धोके लक्षात घेता नुकसान होण्याची भीती असल्याने काहीजण त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे आभासी चलनाचा वापर करून शेअर बाजार शिकण्यासाठी स्टॉकग्रो हा उत्तम पर्याय आहे. फॅण्टसी खेळाप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला १० लाखांचे आभासी चलन दिले जाते. त्याचा वापर करून तुम्ही शेअर बाजारातील व्यवहार करू शकता.

अनॲकॅडमी

विविध माध्यमांतील सर्व विषयांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी अनॲकॅडमी हा उत्तम पर्याय आहे. शालेय अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन याठिकाणी उपलब्ध आहे. विविध राज्यांच्या बोर्डाचा अभ्यासक्रम देखील अनॲकॅडमीवर देण्यात आला आहे. दररोज विविध विषयांतील तज्ज्ञ त्यांचे सत्र तेथे घेत असतात. त्यांच्याशी थेट जोडून लाईव्ह वर्ग, सराव चाचणी, शंका निरसन करता येतात. अनॲकॅडमीवर काही सत्रे विनामूल्य, तर काही सशुल्क आहेत.

अँकर

हल्ली पॉडकास्टला बऱ्यापैकी महत्त्व आले आहे. अनेकजण विविध माध्यमातून ऑडिओ किंवा व्हिडिओ पॉडकास्ट सादर करतात. तुम्हालाही पॉडकास्ट करण्याची आवड असेल, तर अँकर हे ॲप तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. अँकर ॲपवर तुम्हाला रेकॉर्डिंग, एडिटिंग आणि पब्लिशिंग कसे करावे याबाबत सुविधा उपलब्ध करून देते. प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अँकर तुम्हाला तुमचा पॉडकास्ट विनामूल्य वितरित करते. त्याशिवाय त्यावरील प्रेक्षक-श्रोत्यांचा प्रतिसाद तसेच पॉडकास्ट मॉनिटाईज करण्यासाठी मदतही करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com