घरातील उपकरणांसाठी सुरक्षा कवच

ऋषिराज तायडे
Thursday, 11 February 2021

हल्ली त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर होत असल्याने आपले जीवनमान सुखी झाले आहे. मात्र, इंटरनेटने जोडलेल्या नव्या उपकरणांमुळे सायबर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिजिटल गॅजेट्स, नवनवीन उपकरणांचा वापर सध्या बराच वाढला आहे. केवळ मोबईल, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्हीच नव्हे; तर स्मार्ट होम्ससाठीही अनेक गॅजेट्स बाजारात उपलब्ध झाले आहेत. हल्ली त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर होत असल्याने आपले जीवनमान सुखी झाले आहे. मात्र, इंटरनेटने जोडलेल्या नव्या उपकरणांमुळे सायबर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवी उपकरणे वापरताना तुमची सुरक्षितता आणि खासगीपणा जपण्यासाठी पुरेशी काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

सध्या सर्वाधिक वापरली जाणारी आयओटी उपकरणे
  वेअरेबल्स :  स्मार्ट वॉच, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर
  मॉनिटर्स : बेबी मॉनिटर्स, सिक्युरिटी कॅमेरे आणि वेबकॅम
  होम प्रोडक्ट्स :  व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड स्पीकर्स, वेब कनेक्टेड लाइट, फॅन, खिडक्या, दरवाजे

वाय-फाय सुरक्षित करा
नवे उपकरण घरातील वायफाय नेटवर्कला जोडण्यापूर्वी वायफाय नेटवर्क सुरक्षित असल्याची खात्री करा. घरातील उपकरणांसाठी सार्वजनिक वाय-फाय वापरू नका. त्याचा वापर करायचाच असल्यास व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क किंवा व्हीपीएनची अतिरिक्त सुरक्षा वापरावी.

नव्या वर्षातील काही निवडक नवे मोबाईल्स कोणते आहेत पहा

टच आयडीचा वापर करा
नव्या उपकरणांचा वापर करताना टच आयडी किंवा फेसआयडीचा वापर करावा. त्यामुळे घरातील सदस्यांनाच त्याच्या वापराची परवानगी मिळते. तसेच यामधील पासवर्डही कठीण ठेवावा. शिवाय बायोमेट्रिक सिक्युरिटी असल्याने तुम्हाला पुरेशे संरक्षणही मिळते.

पासवर्ड मॅनेजरचा वापरा
वरील प्रमाणे तुम्ही तुमच्या घरातील उपकरणे योग्य पासवर्डने सुरक्षित केल्यानंतर ते तुम्हाला सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजरचा वापर योग्य ठरतो. पासवर्ड मॅनेजरमुळे केवळ तुम्हाला तुमच्या घरातील सर्व उपकरणांना सहज ॲक्सेस उपलब्ध करून देतो. त्याशिवाय ऑनलाइन सुरक्षितता राखण्यात मदतही करतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डिफॉल्ट सेटिंग्ज बदला
नव्या उपकरणांमध्ये बहुतांश वेळा डिफॉल्ट सेटिंग्ज असतात. ज्या तुमच्याऐवजी उत्पादक कंपन्यांच्या फायद्यासाठी निश्चित केलेल्या असतात. त्यामुळे  सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपकरणांमधील डिफॉल्ट सेटिंग्ज बदलून व आवश्यक असलेली सेटिंग्ज निश्चित करावी.

अँटिव्हायरस वापरा 
सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी तुमच्या घरातील उपकरणे सुरक्षित अँटिव्हायरसने सुसज्ज असणे गरजेचे आहे. ही अँटिव्हायरस वेळोवेळी आणि नियमित अपडेट करत राहा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फायरवॉलचा वापर फायदेशीर
तुमच्या घरातील इंटरनेट जोडणी आणि उपकरणे वरीलप्रमाणे सुरक्षित केल्यानंतरही फायरवॉलचा वापर केल्याने तुम्हाला  अतिरिक्त सुरक्षा मिळते. त्यामुळे अनावश्यक नेटवर्क ब्लॉक केले जातात आणि मालवेअरला प्रवेश करण्यापासून अडथळा निर्माण करता येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rushiraj tayade writes Household appliances for protection