गॅजेट्स : लॉकडाउमध्येही नवतंत्रज्ञान जोमात! 

गॅजेट्स : लॉकडाउमध्येही नवतंत्रज्ञान जोमात! 

कोरोनाच्या जागतिक महामारीत अवघ्या जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. अनेक देश लॉकडाउन असल्याने त्याचा मोठा आर्थिक परिणाम भोगावा लागत आहे. आणखी किती दिवस ही व्यवस्था ठप्प राहणार, याची कोणालाच कल्पना नसल्यामुळे त्यातून मार्ग काढत अनेक कंपन्यांनी त्यांची उत्पादने बाजारात आणली आहे. जाणून घेऊयात लॉकडाउनमध्ये बाजारात आलेली काही तांत्रिक उत्पादने... 

१) एमआय १० - ५जी 
भारतीय लोकप्रिय मोबाईल कंपनी शाओमीने त्यांचा पहिला ‘५ जी’ मोबाईल नुकताच भारतीय बाजारात सादर केला. तब्बल १०८ मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि २० मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा असलेला हा मोबाईल ८ जीबी रॅमसह १२८ जीबी आणि ८ जीबी रॅमसह २५६ जीबी मेमरीमध्ये अनुक्रमे ४९,९९९ रुपये आणि ५४,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. 

२) मायक्रोसॉफ्ट सरफेस गो २ 
मायक्रोसॉफ्टने बहुचर्चित सरफेस गो श्रेणीतील ‘मायक्रोसॉफ्ट सरफेस गो-२’ हा नवा ‘२ इन १’ लॅपटॉप अमेरिकन बाजारात सादर केला. १०.५ इंची स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपमध्ये इन्टेल कोअर ८ प्रोसेसर दिले आहे. ६४ जीबी आणि १२८ जीबी मेमरीक्षमता असलेल्या या लॅपटॉपमध्ये ८ मेगापिक्सल बॅक कॅमेरा व ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा दिला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स १६ प्रोसेसर, वायफाय, ब्ल्यूटूथ, टाईप सी यूएसबी कनेक्ट, कार्ड रिडर आदी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. 

३) अॅपल मॅकबुक प्रो 
मार्च महिन्यात सादर केलेल्या मॅकबुक एअर, ‘आयपॅड प्रो’नंतर अॅपलने मॅकबुक प्रो हा नवा लॅपटॉप नुकताच भारतीय बाजारात सादर केला. मागच्या वर्षी आलेल्या १६ इंची लॅपटॉपचे हे लहान व नवे व्हर्जन आहे. या १,२२,००० रुपये किंमत असलेल्या लॅपटॉपमध्ये नवनवीन फीचर्स दिली आहेत. मॅजिक की-बोर्ड, १० जनरेशन इन्टेल प्रोसेसर, ८० पट वेगवान प्रोसेसर, २५६ जीबी मेमरी क्षमता (१ टीबीपर्यंत वाढीव क्षमता) दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com