हिंजवडीचं #DigitalAndolan

TweetToSakal
TweetToSakal

महाष्ट्राचं एकेकाळचं पहिलं परिपूर्ण आयटी पार्क म्हणजे पुण्याचं हिंजवडी. जगभरातल्या आयटी कंपन्या इथं आहेत. आयटी-माहिती तंत्रज्ञान म्हणजे जगातल्या समस्यांवर तंत्रज्ञान वापरून तोडगा काढणारी व्यवस्था. आयटी कंपन्या ‘प्रॉब्लेम्स’च्या शोधात असतात. प्रॉब्लेम मिळाला, की सोल्यूशनचा बिझनेस होतो. एका प्रॉब्लेमवर मात्र कुठल्याही कंपनीला आणि सर्वोत्तम इंजिनिअर्सना अजून उत्तर सापडलेलं नाही. तो प्रॉब्लेम आहे, हिंजवडीतल्या ‘ट्रॅफिक जाम’चा!

भारतातलं कुठलंही शहर घ्या, ट्रॅफिक जामची डोकेदुखी आहेच तिथं. गंमत आणि खेदही वाटतो तो हिंजवडीत ती समस्या असण्याचा आणि त्यासाठी वर्षानुवर्षे छळ होण्याचा. इथल्या कंपन्यांमधलं तंत्रज्ञान जगातल्या सर्वोत्तम महानगरांमधला बिझनेस सांभाळतं आणि कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्याला कामावर पोचण्यासाठी यातायात करावी लागते. 

आयटीन्स असल्यानं इथल्या प्रॉब्लेमवर सोशल मीडियातून आवाज उठविण्याचा प्रयत्न होतो. हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडेंटस्‌ ट्रस्ट (@HEART_PUNE) सातत्यानं ट्रॅफिक प्रश्नाचा ट्विटरवर फॉलोअप घेत राहतात. हिंजवडी आयटी पार्क रेसिडेंटस्‌ वेलफेअर असोसिएशन (@HIRWA_Hinjawadi) नागरी समस्यांवर बोलतात. एरव्ही जगातल्या कुठल्याही प्रश्नावर छातीठोक उत्तर देणारे नेते हिंजवडीच्या प्रश्नावर कडेकडेनं पळतात. हातात नसलेला वेळ हिंजवडीवासीयांना रस्त्यावरच्या आंदोलनापासून दूर ठेवतो. मग त्याचा संताप ट्विटमधून कोणी ना कोणी व्यक्त करतं. ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी आता हिंजवडीवासीयांनी पुकारलंय डिजिटल आंदोलन. हिंजवडीच्या ट्रॅफिक प्रश्नावर एकत्र या आणि उत्तर शोधा, असं आंदोलकांचं आवाहन आहे. ...तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या विषयावर चर्चा व्हायला हवीच, तर जरूर कळवा #TweetToSakal हॅशटॅग वापरून.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com