'सिंहगड इन्स्टिट्यूट'मध्ये स्प्रिंग फेस्ट टेकड्रील २०२४ संपन्न.

सिंहगड इन्स्टिट्यूट'मध्ये विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांसह, प्रमुख पाहुणे व सर्व प्राध्यापक.
सिंहगड इन्स्टिट्यूट'मध्ये विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांसह, प्रमुख पाहुणे व सर्व प्राध्यापक.

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या फेस्ट मध्ये प्रत्यक्ष व ऑनलाईन द्वारे विविध १७ देशातील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

इन्स्टिट्यूटच्या एम.सी.ए कॉलेज मध्ये सिंहगड स्प्रिंग फेस्टिवल अंतर्गत 'टेकड्रील २०२४' हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या अंतर्गत संगणक तंत्रज्ञान संबंधी विविध स्पर्धा, परिसंवाद, कार्यशाळा इ. कार्यक्रम सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट वडगाव बु सह कोंढवा व नर्हे कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये ऑफलाईन स्पर्धांसह या वर्षी प्रथमच ऑनलाईन 'सिंहगड डिजिटल नॉलेज कॉम्पिटिशन २०२४' ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा लंडन स्कूल ऑफ डिजिटल बिझनेस (एलएसडीबी) च्या सहकार्यासह पार पडली. यामध्ये बांगलादेश, किर्गिझस्तान, मॉरिशस, पोलंड, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, युगांडा, यूके, झांबिया, फिलीपिन्स, भारत, अल्जेरिया, यांसारखे देश सहभागी झाले होते. लिबिया, नायजेरिया, श्रीलंका आणि इजिप्त इ. विविध देशातील विद्यार्थ्यांनी आय. सी. टी साधनांचा वापर करून सहभाग घेतला. या विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक व एस. आय.ओ.एम च्या संचालिका डॉ. चंद्रानी सिंग, डॉ. नेत्रा पाटील व डॉ. विजया पुराणिक यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या सिंहगड स्प्रिंग फेस्ट फेस्टिवल ला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एम.एन. नवले सर, संस्थापक सचिव डॉ.सुनंदा एम. नवले मॅडम, उपाध्यक्ष सौ. रचना नवले-अष्टेकर मॅडम व उपाध्यक्ष, डॉ. रोहित नवले सर यांनी कार्यक्रमास भेट देऊन शोभा वाढविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com