राजगड डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यानी जिंकले स्टार्टअप साठीचे एक लाख रुपयांचे बक्षीस.

राजगड डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यानी जिंकले स्टार्टअप साठीचे एक लाख रुपयांचे बक्षीस.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,पुणे, येथे आयोजित स्टार्टअप सर्ज ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातून २७ ग्रूप प्रथम फेरीमध्ये सहभागी झाले होते, त्यापैकी अंतिम फेरीमध्ये १० ग्रूप ची निवड करण्यात आली होती, यामध्ये राजगड डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य श्री ज्ञानेश्वर खोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेले ओंकार खडपे आणि अंजली गायकवाड यांचा एस बाईक १२७४ व सुदेश गुरव आणि संदेश गुरव यांचा रानवारा कुकुटपालन हे दोन्ही ग्रूप अंतिम फेरीत दाखल झाले होते. अंतिम फेरीमध्ये गुरव बंधू यांच्या ग्रूपने एक लाख रुपये व ट्रॉफी असे प्रथम क्रमांक पटकावला. तर खडपे, गायकवाड ग्रूपने पाचवे स्थान प्राप्त केले. विजेत्या स्पर्धकांना मिळालेली रक्कम त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन प्राचार्य खोपडे सर यांनी केले .

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन राजगड ज्ञानपीठ चे कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे आणि सचिवा सौ .स्वरूपा थोपटे यांनी केले. तसेच डिग्रीचे प्राचार्य पाटील सर, इस्टेट मॅनेजर श्री खामकर सर, पॉलीटेक्निक चे प्राचार्य प्रा. खोपडे सर तसेच सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com