esakal | चांदोरी महाविद्यालयात वृक्षारोपण
sakal

बोलून बातमी शोधा

चांदोरी महाविद्यालयात वृक्षारोपण

चांदोरी महाविद्यालयात वृक्षारोपण

sakal_logo
By
टीम YIN युवा

चांदोरी : पद्मश्री कर्मवीर कै.काकासाहेब वाघ, दानशूर कै.काकूशेठ उदेशी, सहकारमहर्षी कै.तात्यासाहेब बोरस्ते या त्रयींचा पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त गुरुवारी(ता.22) के.के.वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे जिमखाना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री कर्मवीर कै. काकासाहेब वाघ, दानशूर कै.काकूशेठ उदेशी, सहकारमहर्षी कै.तात्यासाहेब बोरस्ते या सन्माननीय त्रयींची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय त्रयींचा जीवनपट व शिक्षणक्षेत्र,सहकार क्षेत्र,राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान याविषयी माहिती दिली. ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी या त्रयींच्या कार्यामुळेच पोहचली असे नमूद केले.

हेही वाचा: एकलव्य कथा

जागतिक पातळीवर ग्लोबल वार्मिंगची समस्या,वाढते प्रदूषण यावर मात करण्यासाठी काळाची गरज लक्षात घेऊन 'ग्रीन अँण्ड क्लिन कॅम्पस' या संकल्पने अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण व्हावे, महाविद्यालयाचा परिसर इतरांचे लक्ष वेधून घेणारा असावा, या हेतूने महाविद्यालयाच्या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते.त्यांची जोपासना देखील केली जाते. गत दोन वर्षात लावलेली जवळपास २२४ वृक्ष महाविद्यालयाच्या परिसरात आनंदाने डोलू लागली आहे.

यंदाच्या वर्षी 'काका तात्या पुण्यतिथी' औचित्य साधून फायकस ८०,अशोकाची १० व मोरपंखी ०१ अशी एकूण ९१ वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रा.से.यो.अधिकारी प्रा.पी.पी.आहेर, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.बी.बी.कोल्हे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.डी.एन.दुर्गेस्ट, कला विभाग प्रमुख डॉ.एच.टी.वाघमारे, विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापिका एम.व्ही.कारे, संगणक विज्ञान विभाग प्रमुख प्रा.बी.बी.चौधरी, प्रा.आर.बी.पोटे, प्रा.एस.व्ही.भंडारे, प्रा.एस.जी.सावंत,प्रा.टी.डी.बागूल, प्रा.एस.आर.अस्वले तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका एम.डी.गुंडगळ यांनी केले, प्रास्ताविक प्रा.ए.बी.जंजाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका एस.एम.गायकवाड यांनी केले.

loading image
go to top