भारतात लॉन्च झाली Tiger 850 Sport बाईक; BMW F ला देणार टक्कर

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

ब्रिटिश प्रिमियम बाइक तयार करणारी कंपनी Triumph ने भारतीय बाजारात Tiger 850 Sport बाइक लाँच केली आहे. 

नवी दिल्ली - ब्रिटिश प्रिमियम बाइक तयार करणारी कंपनी Triumph ने भारतीय बाजारात Tiger 850 Sport बाइक लाँच केली आहे. भारतीय बाजारात या बाइकची टक्कर थेट BMW F 750GS या बाइकशी असणार आहे. बुकिंग सुरु करण्यात आले असून मोटारसायकलला 50 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटमध्ये बूक करता येऊ शकतं. गाडीची डिलिव्हरी मार्च महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. 

कंपनीने त्यांची आधीची बाइक Tiger 900 ची रिप्लेसमेंट म्हणून लाँच केली आहे. या बााइकचं सर्वात मोठं वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये असलेलं 888 CC ट्रिपल सिलिंडर इंजिन आहे. 85 PS ची जास्ती जास्त पॉवर आणि 82 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह स्लिप आणि असिस्ट क्लच तंत्रज्ञान आहे. कंपनीचा असा दावा आहे की, टी प्लेन ट्रिपल क्रॅकसह इंजिनला ट्यून करण्यात आलं आहे. या बाइकमध्ये 5 इंचाची फुल कलर टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे. 

हे वाचा - सुझुकीची नवी सुपरबाइक लाँच; Hayabusa 2021 ची फीचर्स आहेत खास

Tiger 850 Sport बाइकमध्ये सहज अॅडजस्ट होईल अशी बिल्ट इन टू पोझिशन सीट हाइट मेकॅनिझम आहे. यामुळे रायडरला सीटची उंची 20 मीमी पर्यंत त्याच्या सेटअपमध्ये बदला येईल. इतर फिचर्सच्या बाबतीत बोलायचं तर Triumph Tiger 850 Sport मध्ये ऑल LED लायटिंग, दोन रायडिंग मोड्स रेन आणि रोड, 5 इंचाची फुल कलर टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे. Tiger 850 मध्ये लेटेस्ट जनरेशन Triumph एबीएस आणि स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोलसुद्धा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: triumph launches tiger850 sport bike in india