सुझुकीची नवी सुपरबाइक लाँच; Hayabusa 2021 ची फीचर्स आहेत खास

टीम ई सकाळ
Friday, 5 February 2021

सुझुकीने Suzuki Hayabusa 2021 चे थर्ड जनरेशनचं मॉडेल अधिकृतपणे लाँच केलं. नव्या 2021 हायाबुसामध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळाले आहेत.

नवी दिल्ली - जपानमधील दिग्गज ऑटो कंपनी सुझुकीने शुक्रवारी मोठी घोषणा करत त्यांची सुपरबाइक लाँच केली आहे. सुझुकीने Suzuki Hayabusa 2021 चे थर्ड जनरेशनचं मॉडेल अधिकृतपणे लाँच केलं. नव्या 2021 हायाबुसामध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळाले आहेत. Suzuki Hayabusa च्या फर्स्ट जनरेशन मॉडेलला कंपनीने 1998 मध्ये लाँच केलं होतं. त्याची विक्री 2007 पर्यंत सुरु होती. यानंतर 2008 मध्ये कंपनीने याच्या सेकंड जनरेशन मॉडेलला लाँच केलं होतं. 

नव्या 2021 सुझुकी हायाबुसा बाइकमध्ये अपड़ेटेड इंजिन देण्यात आलं आहे. यात 1340 सीसी क्षमतेचं इनलाइन 4 सिलिंडर असलेलं लिक्वीड कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन राइड बाय वायर इलेक्ट्रॉनिक थ्रोटल सिस्टिम असलेलं आहे. तसंच सोबत अपडेटेड इनटेक आणि एक्झॉस्ट सिस्टिमही देण्यात आली आहे.

हे वाचा - झूम : अपडेटेड व्हर्जनसोबत राईड

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या नव्या सेटअपचा फायदा लो आणि मिड रेंजमध्ये पॉवर आणि टॉर्क जनरेट करण्यामध्ये होणार आहे. या बाइकचं इंजिन 9,700 rpm वर 187.7 bhp इतकी पॉवर आणि 7,000 rpm वर 150Nm इतका पीक टॉर्क जेनरेट करते. या इंजिनमध्ये आधीसारखेच सहा स्पीड गिअरबॉक्स आहे.  करता है. इस इंजन में पहले की तरह 6-स्पीड गियरबॉक्स दिया गया है.

सध्या कंपनी युरोपीय बाजारात याचे लाँचिंग करत आहे. त्यानंतर जपान आणि उत्तर अमेरिकेत ही बाइक उपलब्ध होईल. भारतीय बाजारात येण्यासाठी या बाइकला अजुन सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो असं म्हटलं जात आहे. 

कंपनीने नव्या सुझुकीमद्ये इंटेलिजेंट राइ सिस्टिम दिली आहे. यात 5 रायडिंग मोड, पॉवर मोड सिलेक्टर, इंजिन ब्रेक कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल. बाय डायरेक्शनल क्विक शिफ्ट सिस्टिम आणि अँटी लिफ्ट कंट्रोल सिस्टिम यांसारखी फीचर्स आहेत. यामध्ये अॅक्टिव्ह स्पीड लिमिटर हे फीचरही मिळते. तसंच मॉडेलमध्ये ड्युअल टोन बॉडी कलरसह शार्प लूक असलेलं डिझाइनही करण्यात आलं आहे. पुढच्या बाजुला बिल्ट इन पोझिशन लाइट्स आणि टर्न सिग्नल आणि एक ऑल एलईडी हेडलाइट आहे. 

हे वाचा - झूम : ‘टेस्ला’ची भारतात ‘टक्कर’

बाइकच्या अॅनालॉग डायलमध्ये एक लहान टीएफटी पॅनेलही दिलं आहे. इतर अपडेटमध्ये मल्टी इंजिन पॉवर मोड, एक क्विकशिफ्टर आणि नवीन इलेक्ट्रॉनिक सस्पेन्शनचा समावेश आहे. त्यासोबत एक कम्प्रेहेन्सिव्ह इलेक्ट्रॉनिक्स सुट यामध्ये मिळू शकतो. हायाबुसा 3 रंगात लाँच करण्यात आली आहे. यात ग्लास स्पार्कल ब्लॅक अँड कँडी बर्न गोल्ड, मेटॅलिक मॅट सिल्व्हर अँड कँडी रेड आणि पर्ल ब्रिलियंट व्हाइट अँड मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू कलरचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suzuki hayabusa 2021 launch superbike features price know details