यिन मंत्रीमंडळाला आजपासून जल्लोषात सुरुवात.

मुख्यमंत्री पदी संभाजीनगरच्या अश्विनी शिजूळ तर उपमुख्यमंत्री पदी पिंपरी- चिंचवडचे युवराज चव्हाण.
 मा. निलमताई गोर्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून यिन अधिवेशनाची सुरुवात
मा. निलमताई गोर्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून यिन अधिवेशनाची सुरुवात

मुंबई,ता. ०६: 'सकाळ' माध्यम समुहाच्या यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क आयोजित शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात झाली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या अधिवेशनाला सुरुवात झाली. या विशेष अधिवेशनाला राज्यभरातील शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी आणि सदस्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झालेल्या या अधिवेशनाला दिवसभर वेगवेगळ्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. हे अधिवेशन गुरुवारपर्यंत मुंबईत सुरु राहणार असून या माध्यमातून वेगवेगळ्या अधिकारी वर्गातील लोकांचे मार्गदर्शन, मंत्री मंडळींचे भाषण आणि अनुभव या विद्यार्थ्यांना ऐकायला व अनुभवायला मिळणार आहे. यंदा यिनच्या अधिवेशनाचे हे ७ वे वर्ष असून मुख्यमंत्री पदी दुसऱ्यांदा ही महिलेची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदी संभाजीनगरच्या अश्विनी शिजूळ या विराजमान झाल्या असून उपमुख्यमंत्री युवराज चव्हाण यांची वर्णी लागली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरले -

पहिल्या सत्रातील सभागृहाची सुरुवात प्रश्न - उत्तरांपासून झाली. विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. मात्र, यावर कोल्हापूर चे गृहमंत्री शिवतेज देवणे यांनी लवकरच तोडगा काढू असे आश्वासन विरोधकांना दिले. तसेच, शिक्षणाचा काळाबाजार, ग्रामीण भागात न पोहोचणारा निधी, ऊसतोड कामगारांच्या मुलांना रोजगार, शेतीविषयक योजना, राज्याची पूरपरिस्थिती, महिला व बालविकास योजनांचे पालन न होणे अश्या अनेक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले गेले. याचसोबत, या शॅडो कॅबिनेट मंत्री मंडळाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली व राजकारणातील अनेक गोष्टींचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. युवा पिढीत नेतृत्व तयार व्हावे, हा यिन चे प्रमुख उद्देश असला तरी नम्रपणे वागणे, आणि राजकारणात टिकायचे असल्यास तर ऐकून घेणे हे कौशल्य ही असायला हवे असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्याचबरोबर, अविनाश घोषिकर, मच्छिंद्र , अशोक अल्लड आणि यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्रीपदी शिवानी शेजुळ , उपमुख्यमंत्रीपदी युवराज चव्हाण, गृहमंत्री पदी शिवतेज देवणे, सभापतीपदी ओंकार डोंबे, उपसभापतीपदी ओंकार आव्हाड, अर्थमंत्रीपदी शिवेश पांडे यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी केशव पाटील यांची निवड झाली आहे.

जल्लोष आणि उत्साहात रंगले यिनचे शॅडो कॅबिनेट -

मंगळवारी यिनच्या सातव्या शॅडो कॅबिनेटला सुरुवात झाली. सदस्यांनी मोठ्या जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात पहिल्या दिवशी उपस्थिती लावली. मंत्रीमंडळातील सदस्यांना काही ठराविक विषय मांडण्यात सांगण्यात आले होते. त्यानुसार, यिन मुख्यमंत्री शिवानी शेजुळ यांनी विरोधकांना सोबत घेऊन काही महत्त्वाच्या ठरावांवर विचारविनिमय करुन निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिले. यावर विरोधकांनी ठरावातील काही त्रुटी दुरुस्त करुन एकत्रितरित्या यावर काम केले जाईल आणि विरोधीपक्ष ही या ठरावाला पाठिंबा देईल याची ग्वाही दिली. तसेच, अनेक मुद्दयांवरुन विरोधकांनी गदारोळ ही माजवला. मात्र, अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधक आणि सत्ताधारी यांनी सभागृहाची शिस्त पाळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com