esakal | जागतिक युवा कौशल्य दिनी 'यिन' सदस्यांची 'आयकॉन स्टील'ला भेट
sakal

बोलून बातमी शोधा

 जागतिक युवा कौशल्य दिनी 'यिन' सदस्यांची 'आयकॉन स्टील'ला भेट

जागतिक युवा कौशल्य दिनी 'यिन' सदस्यांची 'आयकॉन स्टील'ला भेट

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

जालना : यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १६) औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. दावलवाडी  येथील विनोदराय इंजिनिअरिंग आणि एमआयडीसी भागातील आयकॉन स्टील या दोन  कंपन्यांना यिन सदस्यांनी भेट दिली.  आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, जगदीश राठी, श्रीनंदन राठी, प्राचार्य डॉ. एस. के बिरादार यांनी यिनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

उद्योग क्षेत्रात आयकॉन स्टीलने मिळविलेल्‍या यशाबद्दल आणि कंपनीच्या उत्पादन, कामकाजाविषयी  कंपनीचे एच. आर अभिजित खरात, अभिषेक द्विवेदी, अभिषेक कानगावकर, रमेश भोसले यांनी माहिती दिली. तर विनोदराय  इंजिनिअरिंगचे  व्यवस्थापकीय संचालक सुनील रायठट्टा, एच. आर वर्षा जाधव, हर्षदा पवार यांनी कंपन्यांचे उत्पादन, गुणवत्ता आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सदस्यांना दिली. यावेळी  प्रा. पंकज भोयर, नारायण शेळके, यिन कृषीमंत्री वर्षा लोंढे, श्रीराम पोटभरे यांच्यासह विविध महाविद्यालयातील यिन सदस्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: शेतकऱ्यांनो थांबा, घाई करु नका; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच

''देशाचे भविष्य बदलण्याची ताकत युवकांमध्ये आहे. उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करायची असल्यास ग्राहकाच्या गरजा ओळखता आल्‍या पाहिजेत.  उत्पादकाला होणारा लाभ, ग्राहकांचे समाधान आणि गुणवत्तापूर्ण उत्तापदं केल्यास उद्योग क्षेत्रात यशस्वी होता येईल. उद्योग एकमेव असे क्षेत्र आहे जिथे कुठल्याच आरक्षणाची गरज नाही. जगात कुठेही व्यवसाय  करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला नोकरी मिळेल याची शाश्‍वती नसल्याने ज्याच्याकडे ज्ञान आणि कौशल्य आहे त्यांनी उद्योग क्षेत्रात आवश्‍य आले पाहिजे. ''

-सुनील रायठट्टा, उद्योजक

''विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यिन नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करीत आहे. स्टील आणि सीड्स हब म्हणून जालना शहराची ओळख आहे. जिल्ह्यातील युवकाला उद्योग क्षेत्राची ओळख होणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रातील बारकावे, कौशल्य आत्मसात करण्यासाठी अशा औद्योगिक भेटीचे आयोजन होणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे अभियांत्रिकीची जोड मिळाल्‍याने उद्योग क्षेत्र अधिक गतिमान झाले आहे.''

- डॉ. एस. के बिरादार, प्राचार्य, मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय

हेही वाचा: 'ट्रॅजिडी किंग' दिलीप कुमारांचा नवाबी अंदाज

loading image