'यिन' पुणे शहरच्या वतीने सिंहगडावर स्वच्छता मोहिम.

सिंहगडावर स्वच्छता मोहिम
सिंहगडावर स्वच्छता मोहिम

पुणे शहर यिनच्या वतीने सिंहगड किल्ले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात अली होती. गडाला भेट देऊन शिवविचारांचे आणि गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी गडावर स्वच्छता मोहीम राबविली गेली. पर्यटनासाठी गडकिल्ल्यांना भेटी देताना अनेक जण तेथे मोठ्या प्रमाणात कचरा करतात. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांमुळे किल्ल्यांचे विद्रुपीकरण वाढते. आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपणच आपल्या किल्ल्यांचा इतिहास जपला पाहिजे. त्याची स्वच्छता राखली पाहिजे.

साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रातील गडकोट किल्ले यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. हे गड किल्ले शिवकालीन कालखंडाचे साक्षीदार आहेत. आजही आपण त्यांचा वारसा जतन करत आहोत. आज-काल गड किल्ले हे पर्यटन स्थळ बनले असले तरी बहुतांश शिवप्रेमी या वारशाचे संवर्धन करण्यासाठी पुढे येत असतात. याच विचारातून 'यिन' पुणे शहरच्या वतीने 'गड स्वच्छता मोहीम' हाती घेण्यात आली होती. या वेळी ३० हुन अधिक पोती कचरा गोळा करण्यात आला.

या मोहिमेसाठी यिनच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचे सभापती तसेच पुणेचे अध्यक्ष ओंकार डोंबे, यिन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुणेचे कार्याध्यक्ष धैर्यशील राजेभोसले, सिंहगड लॉ कॉलेज यिन उपाध्यक्ष यशराज पाटील यांनी पुढाकार घेतला. सुशांत कुटे, सुफियान तांबोळी, श्रद्धा उदेक तसेच आबासाहेब गरवारे कॉलेज चे व सिंहगड लॉ कॉलेजचे ४० हुन अधिक यिन विद्यार्थी या मध्ये सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com