यिन च्या सेंट्रल कॅबिनेट मंत्र्यांचा काश्मीर अभ्यास दौरा नुकताच पार पडला. दौऱ्याहून परतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मनातील काश्मीर...

शिक्षण, व्यवसाय, रोजगार, समाजकार्य, कृषी, पर्यटन या विषयाचा प्रामुख्याने केला अभ्यास ...
YIN central cabinet committee members.
YIN central cabinet committee members.

माझा मूळ स्वभाव शोधवृत्तीचा असल्या कारणाने काश्मीर दौरा माझ्या माझ्यासाठी प्रचंड शिकण्यासारखा होता. महाराष्ट्र आणि काश्मीर यामध्ये मोठी विभिन्नता मी अनुभवली. काश्मीरची अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था तसेच काश्मीर ची संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती यामध्ये खूप विभिन्नता असल्याचे अनुभवले. नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर शहर पण तितकेच संवेदनशील शहर काश्मीर असल्याचे मी अनुभवले.

- अनिकेत बनसोडे, कार्याध्यक्ष, यिन केंद्रीय कॅबिनेट मुख्य समिती तथा अध्यक्ष, क्रीडा समिती.

काश्मीर सारख्या संवेदनशील भागात जात असताना मनात अनेक शंका आणि प्रश्न होते. परंतु तिथे गेल्या नंतर तेथील लोकांकडून मिळालेलं प्रेम, आदरातिथ्य आणि तिथले वातावरण पाहिले. तेव्हा काश्मीर च्या सौंदर्या प्रमाणे तिथल्या लोकांचे मन देखील सुंदर आहे. आपल्याला दाखवला जाणारा आणि प्रत्यक्षात असणारा काश्मीर या मध्ये खूप तफावत आहे. गोळीबार, आतंकवादी हल्ले या व्यतिरिक्त देखील व्यवसाय, रोजगार,व्यवस्था असे देखील तेथील प्रश्न आहेत.

- सायली वाडदेकर, संघटक, स्त्री प्रतिष्ठा समिती.

यिनच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जम्मू-काश्मीर अभ्यास दौऱ्याची संधी यिनने उपलब्ध करून दिली. त्यानिमित्ताने प्रचंड चांगले अनुभव अनुभवयास मिळाले. जम्मू-काश्मीरमधील लोकांचे जीवनमान, राहणीमान अनुभवयास मिळाले. त्यादृष्टीकोनातून जम्मू-काश्मीर मधील लोकांचा सर्वच बाबतीतील संघर्षमय प्रवास, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याचे धाडस अनुभवयास मिळाले.

- प्रज्वल ढाणे, प्रवक्ता, उद्योजक समिती.

जम्मू-काश्मीर आभ्यास दौरा निमित्त तेथील सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी ह्या सध्या स्थिती जवळून पाहता आल्या कलम ३७० च्या विषयी काश्मीर पंडितांचे नेतृत्व करणारे संजय टिपू सर यांच्याकडून माहिती मिळाली हा जवळून अभ्यास मिळाली.काश्मीर जन्नत है झहानूम नही.

- सत्यजित कदम, प्रवक्ता, राजकीय समिती.

जम्मू काश्मीर दौरा माझ्यासाठी खुप आनंददायी होता. मला या अभ्यास दौर्यामध्ये मला माहित असलेले समज ग़ैरसमज दूर झाले, तिथे गेल्यानतर तेथील लोकानी खुप आदरयुक्त स्वागत केले पाहूणचार केला व तेथील शिक्षण पद्धत खुप छान आहे, तेथील शैक्षणिक साक्षरता जास्त आहे व तेथील राजकीय, सामाजिक, अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा वेगळी अनुभवली,जम्मू काश्मीर निसर्गरम्य वातावरण हे जणू काही स्वर्गच आहे.

- अजय खांडबहाले, कार्याध्यक्ष, राजकीय समिती.

काश्मीरमधील प्रमुख समस्या रोजीरोटीची आहेत. या पाच दिवसात आम्ही अनुभवले त्यातून असे वाटते की, काश्मिरी नागरिकांसाठी काहीतरी केले पाहिजे. आम्ही तिथला अहवाल तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहोत.

- दिव्या भोसले, अध्यक्षा, यिन केंद्रीय कॅबिनेट समिती.

काश्मीर दौऱ्यानिमित्त घेतलेला अनुभव हा नक्कीच आगळावेगळा असा होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आणि काश्मीर मधील शेतकऱ्यांचे प्रश्न यावर तुलनात्मक चर्चा करता आली. राजकीय, सामाजिक, आर्थिक, भावनिक अशा प्रत्येक आघाडीवर अजून बरेच काम होण्याची गरज आहे मात्र काश्मिरी जनतेचा विश्वास आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे नक्कीच शक्य होईल ही आशा आम्हाला आहे.

- निलेश चव्हाणके, अध्यक्ष, रोजगार समिती.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जम्मू-काश्मीर अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो असता तिथे राजकीय सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक सर्व क्षेत्राचा सर्वांगीण अभ्यास केला यामध्ये प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमधील स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करत असताना तेथील युवकांना सर्वात मोठी गोष्ट हवी ती म्हणजे रोजगार कारण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न हा असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह पर्यटनावरतीच होत असतो तेथील युवकांना रोजगार उपलब्ध झाल्यास तेथे स्थानिक प्रश्न सोडवले जातील.

- परमेश्वर इंगोले, अध्यक्ष, राजकीय समिती.

काश्मीर मध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. त्याठिकाणी व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. काश्मीर मधील लोक काश्मिरच्या सौंदर्य इतके सुंदर आणि दिलदार आहेत. काश्मीर मधील शैक्षणिक व्यवस्था ही अतिशय उत्तम व शिस्तबध्द आहे. काश्मीर मध्ये अनेक जाती,धर्म व पंथाचे लोक सामाजिक सलोखा नांदवत आहेत.काश्मिरच्या खाद्य संस्कृतीची एक वेगळीच चव आहे, जी जगात कुठेच मिळणार नाही.

- प्रसाद सातपुते, उपाध्यक्ष, उद्योजक समिती.

ह्या संपूर्ण दौऱ्यात काश्मीर च्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करता आला जवळून अनुभवता आलं प्रचंड नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेलं हे राज्य आहे. काश्मीर चे जे चित्र जगासमोर निर्माण केलं जातंय त्याच्या कितीतरी वेगळं काश्मीर आम्हाला बागायला अनुभवायला मिळालं इथल्या लोकांचे जगण्याचे प्रश्न हे खुप वेगळे आहेत काश्मीरच वास्तव आणि प्रश्न जगासमोर आले पाहिजे.

- ॲड. सत्यम धुमाळ, संघटक, राजकीय समिती.

काश्मीर विषयीची मनातील मतभेद तेथे गेल्यावर लोकांशी संवाद साधून अधिक समजले. तिथले साक्षरतेचे प्रमाण खूप चांगले आहे. फक्त पर्यटन म्हणून न पाहता तेथील राजकारण, उद्योजक, रोजगार, सामाजिक प्रश्न, प्रशासकीय कामातील अडचणी याचा आम्ही अभ्यास केला. अशी संधी तुम्हालाही मिळू शकते त्यासाठी यिन मध्ये आजच सहभागी व्हा.

- अनिकेत मोरे, यिन महा. मुख्य अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com