एकेकाळी Restaurant मध्ये गाणारा तरुण बनला कोट्याधीश, YouTube Star भुवन बामचा थक्क करणारा प्रवास

भुवन बामचं BB Ki Vines नावाचं युट्यूब चॅनल असून त्याचे २६.३ मिलियन सबस्क्रायबर आहेत. केवळ ६-७ वर्षांच्या काळामध्ये भुवनने मोठी लोकप्रियता मिळवली आहे
भुवन बाम
भुवन बामEsakal

आजच्या घडीला हजारो नव्हे तर लाखांच्या संख्येत युट्यूबर्स आहेत. अनेकांना पैसा कमावण्यासाठी तर काहींना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी यूट्यूबर Youtuber बनायचं आहे. मात्र यूट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकालाच यश मिळेलच असं नाही. Youth Youtuber Bhuvan Bam Success Story

ज्यांच्यामध्ये काहीना काही कौशल्य Skill आहे, वेगळेपण आणि सतत काही ना काही नवं करण्याची इच्छा आहे अशा अनेकांना यूट्यूबवर मोठं यशही मिळालं आहे. यापैकीत एक आहे यूट्यूबर भुवन बाम. Bhuban Bam

भुवन बाम आज यूट्यूबवरील एक सेलिब्रिटी Celebrity आहे. यूट्यूबमुळे मध्यमवर्गीय भुवन कोट्याधीश झाला. त्याला प्रसिद्धी देखील मिळाली. YouTube नंतर भुवनने काही वेबसीरिज आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करूनही त्याच्यातील कला दाखवून दिली आहे. अवघ्या २६व्या वर्षी भुवनकडे मोठी संपत्ती आहे.

भुवन बामचं BB Ki Vines नावाचं युट्यूब चॅनल असून त्याचे २६.३ मिलियन सबस्क्रायबर आहेत. केवळ ६-७ वर्षांच्या काळामध्ये भुवनने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मराठी कुटुंबातील भुवनचा जन्म गुजरातमधील वडोदरा इथं झाला. त्यानंतर तो दिल्लीला स्थायिक झाला. भुवनला सुरुवातीपासून गायनाची आवड होती. मात्र या क्षेत्रात मोठा संघर्ष असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

हे देखिल वाचा-

भुवन बाम
YouTuber : आता छोट्या यूट्यूबरलाही मिळणार कमाईची संधी

सुरुवातीला भुवन दिल्लीतील कॅफेमध्ये गाणं गायचा. यासाठी त्याला महिन्याला केवळ ५ हजार रुपये मिळत. त्यानंतर गायनाच्या क्षेत्रात त्याने करियर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आलं. त्यानंतर भुवन फेसबुकवर काही व्हिडीओ टाकू लागला. कालांतराने त्याने युट्यूबवर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली.

भुवननं काश्मिरमधील पुरस्थितीत एका पूरग्रस्त महिलेची मुलाखत घेणाऱ्या एका रिपोर्टरचा एक व्यंगात्मक व्हिडीओ बनवला. काश्मीरमधील पूरस्थितीत एका महिलेने आपल्या मुलाला गमावलं होतं. यावर एका रिपोर्टरने या महिलाला “तुम्हाला कसं वाटतंय ” असा सवाल केला. य़ा असंवेदनशील प्रश्नावर भुवनने व्यंगात्मक व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ देशभरात चांगलाच व्हायरल झाला.

२०१५ सालामध्ये भुवनने BB Ki Vines नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं. यावर तो काही कॉमेडी तर काही देशातील परिस्थिती, राजकारण यावर व्यंगात्मक व्हिडीओ बनवून अपलोड करू लागला. भुवनच्या या चॅनलला आणि त्याच्या व्हिडीओला मोठी पसंती मिळू लागली.

अशा प्रकारे भुवनने न ठरवताच तो युट्यूबर बनला. त्याच्या करियरला एक नवी दिशा मिळाली. तो एक कॉमेडियन तसंच एक कलाकार म्हणून ओळखला जाऊ लागला. भुवनने स्वत:च्या मोबाईलमध्येच व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. स्वत: आणि कुटुंबातील किंवा मित्राना सामील करून तो हटके व्हिडीओ तयार करू लागला.

बघता बघता भुवन बाम युट्यूबवरील एक स्टार बनला. बुवन बाम सध्या भारतातीस सर्वात श्रीमंत युट्यूबर्सपैकी एक आहे. भुवनकडे आज जवळपास १२२ कोटी रुपयांची सपंत्ती आहे. वर्षाला तो युट्यूब, जाहिराती आणि बेवसीरिज तसंच सिनेमांमधून करोडोंची कमाई करतो.

हे देखिल वाचा-

भुवन बाम
YouTube : खुशखबर! आता युट्यूबवर पैसे कमवणे झाले सोपे; फक्त 500 सब्सक्राइबर्स असले तरी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com