पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

आमच्या संघटनेची तेल कंपन्यांसोबत 29 जून रोजी एक महत्त्वपुर्ण बैठक पार पडली. त्यावेळी तेल कंपन्यांनी किंमतीची हमी आवश्यक असल्याचे मान्य केले होते. परंतु, याची अंमलबजावणी केव्हा होईल त्याबाबत नेमकी तारीख त्यांनी सांगितली नाही.

मुंबई - देशातील पेट्रोलपंप चालकांनी येत्या बुधवारी (5 जुलै) 'नो पर्चेस डे' जाहीर करीत 12 जुलै रोजी देशव्यापी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. तेल कंपन्यांनी सर्व पेट्रोलपंपावर 100 टक्के स्वयंचलित प्रणाली लागू केली नसून नव्या दर प्रणालीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने(एआयपीडीए) केला आहे.  

याविषयी बोलताना संघटनेचे प्रवक्ते अली दारुवाला म्हणाले की, "आमच्या संघटनेची तेल कंपन्यांसोबत 29 जून रोजी एक महत्त्वपुर्ण बैठक पार पडली. त्यावेळी तेल कंपन्यांनी किंमतीची हमी आवश्यक असल्याचे मान्य केले होते. परंतु, याची अंमलबजावणी केव्हा होईल त्याबाबत नेमकी तारीख त्यांनी सांगितली नाही. कंपन्यांनी आम्हाला 30 जूनच्या दुपारपर्यंत थांबण्याचे आवाहन केले होते. परंतु त्याबाबत अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच आम्ही हे आंदोलन पुकारत आहोत", 

तेल कंपन्यांनी केवळ एक टक्का पेट्रोल पंपावर स्वयंचलित प्रणाली बसवली आहे, असे पश्चिम बंगाल पेट्रोलियम संघटनेचे अध्यक्ष तुषार सेन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. याप्रकरणी, नॉर्थ ईस्ट इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या ग्रेटर गुवाहाटी युनिटने आज(सोमवार) 24 तासांचा संप पुकारला आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​