Bihar| बिहार विधानपरिषद निवडणुकीत एनडीएची बाजी, १३ जागा जिंकल्या

बिहारच्या विधानपरिषदेच्या २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Bihar Legislative Council Elections
Bihar Legislative Council Electionsesakal

पाटणा : बिहारच्या विधानपरिषदेच्या २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत (Bihar MLC Election Results 2022) राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा बाजी मारली आहे. निम्म्यापेक्षा अधिक जागा एनडीएने जिंकल्या आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत २३ जागांचे निकाल घोषित करण्यात आले. यात १३ जागा एनडीएने मिळवल्या. राष्ट्रीय जनता दलने (राजद) पाच जागांवर विजय मिळविला आहे. चार जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. एनडीएत भाजपला (BJP) सात, राष्ट्रीय जनता दलला (संयुक्त) ५ आणि पारस यांच्या रालोसपाने एक जागा जिंकली आहे. (Bihar MLC Election Results NDA Won More Seats)

Bihar Legislative Council Elections
श्रीलंकेतील आर्थिक संकट थांबता थांबेना, औषधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई

काँग्रेसनेही एक जागा मिळवली आहे. यंदा जदयूने ११ आणि भाजपने १२ जागांवर आपापले उमेदवार उभे केले होते. राजदने २३ उमेदवारांना मैदानात उतरवले होते. जदयूने मुझफ्फरपूर, नालंदा, भोजपूर, सीतामढी आणि भागलपूर या जागा जिंकल्या आहेत. भाजपने पूर्णिया, गोपालगंज, रोहतास, समस्तीपूर, औरंगाबाद आणि कटिहार येथे विजय मिळविला आहे. पारस यांच्या रालोसपाने हाजीपूरची जागा जिंकली आहे.

Bihar Legislative Council Elections
राकेश टिकैत पुन्हा शेतकरी आंदोलन छेडणार; मोदी सरकारला दिला थेट इशारा

राजदने राजधानी पाटणा आणि मुंगेरसह पश्चिम चंपारण, गया आणि सीवान आदी जागा जिंकल्या. काँग्रेसने बेगुसरायची जागा जिंकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com