भाजप कार्यालयात सुरक्षेसाठी अग्निविरांना प्राधान्य - विजयवर्गीय

भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्यीय यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे
kailash vijayvargiya
kailash vijayvargiyafile photo

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. या भाजपचे नेते सातत्याने अग्निपथ योजनेचे फायदे तरूणांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान इंदौरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक ठेवताना अग्निवीरांना प्राधान्य देईल, असे कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. (BJP kailash vijayvargiya said if security guard is needed in bjp office then will be given job to agniveer)

कैलास विजयवर्गीय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह देशातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा एवढा अनादर करू नका, असे म्हटले आहे. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात कारण त्यांना सैन्यात भरती होऊन आयुष्यभर देशसेवा करायची आहे, भाजप कार्यालयाबाहेर गार्ड व्हायचे आहे म्हणून नाही, असे ते म्हणाले आहेत.

बिहार आणि यूपीनंतर आता मध्यप्रदेशातही अग्निपथ योजनेवरून गोंधळ सुरू आहे. इंदौरमध्ये लष्कराच्या उमेदवार दोन दिवसांपासून सतत निदर्शने करत आहेत. रविवारी कैलाश विजयवर्गीय मीडियाशी संवाद साधण्यासाठी इंदौरमधील भाजप कार्यालयात पोहोचले. याबाबत कैलाश विजयवर्गीय यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले. त्यानंतर अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर बाहेर पडल्यावर १३ लाख रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसेच त्याच्यावर अग्निवीरचा शिक्काही लागलेला असेल. भाजप कार्यालयात सुरक्षा गार्डची नेमणूक करण्यासाठी देखील अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.

kailash vijayvargiya
MLC Election 2022: उद्या भाजपलाच धक्का बसू शकतो, रोहित पवारांचा इशारा

ते म्हणाले की, अमेरिका, चीन आणि फ्रान्समध्ये कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाते. आपल्याकडे सैन्यातून निवृत्तीचे वय जास्त आहे. ती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते म्हणाले की, जेव्हा अग्निवीर ही पदवी घेऊन ते सैन्यातून निवृत्त होतील आणि मलाही या भाजप कार्यालयात सुरक्षारक्षक (गार्ड) ठेवायचा असेल, तर मी अग्निवीरलाच प्राधान्य देईन.

दरम्यान केंद्र सरकारने शनिवारी 'अग्निपथ' योजनेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर निमलष्करी दल आणि संरक्षण मंत्रालयांच्या नियुक्त्यांमध्ये "अग्नीवीर" यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले आणि इतर अनेक सवलतींची देखील घोषणा केली आहे.

kailash vijayvargiya
हिंसाचारात सहभागी नव्हतो; 'अग्निवीर' उमेदवारांना द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अग्निपथबाबतच्या सर्व शंका दूर झाल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे - भाजपचे कैलाश विजयवर्गीय. हा सत्याग्रह याच मानसिकतेविरुद्ध आहे असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. अग्निवीरांच्या मुद्द्यावर वक्तव्य करून त्यांनी पक्षाची कोंडी केली आहे. कैलास यांच्या वक्तव्यावर मध्यप्रदेशाती भाजप नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com