सरकार शेतकऱ्यांना फक्त गोळ्या घालते: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

पोलिसांनी मला अटक करताना कोणतेही कारण दिलेले नाही. अशाच प्रकारे मला उत्तर प्रदेश येथे जातानाही रोखण्यात आले होते. मोदी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाही. मला शेतकऱ्यांना भेटायचे होते.

मंदसोर - केंद्रातील आणि मध्य प्रदेशातील सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. त्यांना बोनस दिला जात नाही. फक्त त्यांना गोळ्या घातल्या जातात, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या मंदसोर येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आले होते. मात्र, पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. राहुल गांधी पोलिसांना चकवा देत बाईकवरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले.

राहुल गांधी म्हणाले, की पोलिसांनी मला अटक करताना कोणतेही कारण दिलेले नाही. अशाच प्रकारे मला उत्तर प्रदेश येथे जातानाही रोखण्यात आले होते. मोदी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाही. मला शेतकऱ्यांना भेटायचे होते. पण, कोणतेही कारण न देता अटक करण्यात आली. तुमचे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी न जुळाल्यास तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये प्रवेश मिळणार नाही.

मंदसोर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्याजागी ओ. पी. श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मनोज सिंह हे नवे पोलिस अधीक्षक असणार आहेत. मंदसोर जिल्ह्यात रॅपिड एक्शन फोर्स (आरएएफ) तैनात करण्यात आली आहे. मंदसोर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
म्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू
मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला
धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान