खाद्यतेलाच्या किमती भडकल्या; प्रतिकिलो २० रुपयांची वाढ

Food Oil Price : रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
Food Oil Price
Food Oil Price Sakal

Food Oil Price Increased: रशिया-युक्रेनच्या युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या (Food Oil) किंमतीमध्ये प्रतिकिलो वीस रुपयांची वाढ झाली असून आता या युद्धाची झळ सर्वसामान्यांनाही बसणार आहे. खाद्यतेलाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांनतरही ही भाववाढ झाली आहे.

रशिया युक्रेनमुळे सुर्यफूल तेलाची (Sunflower Oil) घटलेली आयात, सर्व पुरवठादार देशांकडून अपुरा पुरवठा, देशांतर्गत सोयाबीनचं कमी उत्पादन यामुळे ही खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये ही भाववाढ झाली आहे.

Food Oil Price
नागपूर : खाद्य तेल महागच; तूर, हरभरा स्वस्त

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील खाद्यतेलाच्या (Edible Oil) आयातीवर झाला आहे. या दोन्ही देशांतून भारत सूर्यफूल तेलाची मोठ्या प्रमामात आयात करतो. परंतु युद्धामुळे सर्व बंदरे बंद असल्यामुळे या सूर्यफूल तेलाच्या आयात करण्यात अडचणी आहेत. याशिवाय इतर देशांकडून पामतेलाचा पुरवठा होत नाही. ब्राझील, अर्जेंटिना यांसारख्या पामतेल पुरवठादार देशांनीही पुरवठा कमी केला आहे.

Food Oil Price
अच्छे दिन! खाद्य तेल फक्त सहा रुपयांनी स्वस्त

याशिवाय मोहरी तेल भारतीय बाजारपेठेत अजून दाखल झालेले नाही आणि झाले तरी त्याचा वापर भारतातील खूप मर्यादित भागात होतो. याशिवाय देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादनही यंदा कमी झाले आहे. त्याचेही परिणाम खाद्यतेलाच्या किंमतीवर झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com