योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी

International Yoga Day: PM Modi Leads Celebrations in Lucknow
International Yoga Day: PM Modi Leads Celebrations in Lucknow

लखनौ - योग अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. भारताबाहेर जगभरात योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे. दररोज योग करणे हाच आरोग्यविमा असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

राजधानातील "कॅननॉट प्लेस' येथील "सेंट्रल पार्क'मधून न्यूयॉर्कमधील "सेंट्रल पार्क'पर्यंत अवघे जग आज (बुधवार) योगमय झाले आहे. तिसऱ्या जागतिक योग दिनानिमित्त लखनौमधील रमाबाई आंबेडकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष योग सत्रामध्ये 55 हजार लोक सहभागी झाले होते. पावसानंतरही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद होता. योग दिनानिमित्त देशभर विविध ठिकाणांवर पाच हजार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील दीडशे देशांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्या त्या देशातील भारतीय उच्चायुक्तालयांनी या कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतला. पॅरिसमधील आयफेल टॉवर, लंडनमधील ट्राफलगार स्क्वेअर आणि न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क परिसरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मोदी म्हणाले, की मागच्या तीनवर्षात अनेक नव्या योगा संस्था आकाराला आल्याचा आनंद आहे. योग शिक्षकांची मागणी वाढत चालली आहे. फक्त शारीरीक तंदुरुस्ती नव्हे, निरोगी शरीस्वास्थ महत्त्वाचे आहे. योगामुळे आरोग्याची खात्री मिळते. योगासने करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. जेवणामध्ये जसे मीठ लागते तसेच योगाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवा. देशभरात योग दिवस साजरा करणाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com