'जग्गा जासूस'मधील अभिनेत्रीचा आढळला मृतदेह

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

गुरुग्राममधील पॉश सुशांत लोक भागात विदिशा आणि तिचा पती राहत होते. मंगळवारी सायंकाळी तिच्या घरातच तिचा मृतदेह आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुरुग्राम : 'जग्गा जासूस' चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा बेझबरुहा हिचा मृतदेह तिच्या निवासस्थानी आढळून आला. याप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

गुरुग्राममधील पॉश सुशांत लोक भागात विदिशा आणि तिचा पती राहत होते. मंगळवारी सायंकाळी तिच्या घरातच तिचा मृतदेह आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विदिशा हा गायकही होती. तिने नुकताच प्रसिद्ध झालेल्या 'जग्गा जासूस' या चित्रपटात भूमिका साकारली होती. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

मुळची आसामची असलेल्या विदिशाने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच मुंबईहून गुरुग्रामला स्थायिक झाली होती. घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. तिचे वडील तिला सोमवार सायंकाळपासून फोन करत होते. मात्र तिने फोन न उचलल्याने ते तिच्या घरी गेले त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक दीपक सहरान यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :