अयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा

वृत्तसंस्था
रविवार, 23 जुलै 2017

जयपूर, ता. 22 (पीटीआय) : शांततापूर्ण चर्चेनंतर कायदेशीर मार्गाने अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहावे, अशी भाजपची इच्छा असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले. राजस्थानच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी आज पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.

"गेल्या चार लोकसभा निवडणुकांपासून भाजपची भूमिका कायम आहे. अयोध्येमध्ये राममंदिर कायदेशीर मार्गानेच उभारले जावे आणि यासाठी शांततापूर्ण चर्चा आवश्‍यक आहे,' असे शहा म्हणाले. शहा यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी चर्चा करावी आणि निवडणूक आयोगासमोर हा मुद्दा मांडावा. दोन्ही निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, ही भाजपची भूमिका आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सर्व पक्षांशी चर्चा करणार आहेत, असे शहा म्हणाले. केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचीही माहिती शहा यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: