नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला; 1 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

गेल्या 48 तासांत दुसऱ्यांदा या भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला होता.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये बुधवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा दहशतवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला असून, दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलओसीवरून भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. दहशतवाद्यांनीही केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला असून, दोन जवान जखमी झाले आहेत. दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले असून, अन्य दहशतवाद्यांचा परिसरात शोध घेण्यात येत आहे. सहा दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे आढळून आले.

गेल्या 48 तासांत दुसऱ्यांदा या भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला होता. या वेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
म्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू
मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला
धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान