अमृतसरजवळ 2 पाकिस्तानी घुसखोरांना 'BSF'ने घातले कंठस्नान

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सीमा सुरक्षा बलाने त्यांना शरण येण्याचे आवाहन केले असता त्यांनी थेट BSFच्या जवानांवर गोळीबार सुरू केला

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला. दोन पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. 

अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी मध्यरात्री दोन पाकिस्तानी नागरिक घुसखोरी करत होते, असा संशय होता. सीमा सुरक्षा बलाने त्यांना शरण येण्याचे आवाहन केले असता त्यांनी थेट BSFच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यावर सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी त्यांना कंठस्नान घातले. 

घुसखोरांनी स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर BSFच्या पुढच्या फळीतील सैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने 'कव्हर' घेत त्यांना उत्तर दिले. कुंपणाजवळ त्यांना मारल्यानंतर त्यांच्याकडील हेरॉईनची प्रत्येकी एक किलो वजनाची चार पाकिटे ताब्यात घेण्यात आली. तसेच, AK-47 बंदुक, काडतुसे, एक 9mm पिस्तुल, एक पाकिस्तानी मोबाईल फोन आणि पाकिस्तानी चलनातील 20 हजार रुपये ताब्यात घेण्यात आले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :