ऋषी कपूरने केले महिला संघाबद्दल आक्षेपार्ह ट्विट

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

लॉर्डस मैदानावर सौरव गांगुलीने केलेली कृती पुन्हा केली जाईल याची वाट पाहत आहे. 2002 मध्ये भारताने नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर गांगुलीने केलेली कृती आठवतेय.

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी महिला क्रिकेट संघाबद्दल रविवारी सायंकाळी आक्षेपार्ह ट्विट केले. या ट्विटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात महिला विश्वकरंडकाचा अंतिम सामना सुरु असतानाच ऋषी कपूर यांनी रविवारी सायंकाळी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते, की लॉर्डस मैदानावर सौरव गांगुलीने केलेली कृती पुन्हा केली जाईल याची वाट पाहत आहे. 2002 मध्ये भारताने नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर गांगुलीने केलेली कृती आठवतेय.

त्यावेळी गांगुलीने अंतिम सामना जिंकल्यानंतर आपला टी शर्ट काढून भिरकावला होता. याचप्रमाणे कृत्य महिला टीमनेही इंग्लंडला हरवून करावे, असे सुचविणारे अश्लिल टि्वट ऋषी कपूर यांनी केल्याने त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या ट्विटवर प्रतिक्रिया देत दारू पिऊन ट्विट केल्याचा टीका त्यांच्यावर करण्यात आली.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :