सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील रफियाबाद भागात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांध्ये चकमक झाली. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील सोपोरमध्ये आज  (बुधवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील रफियाबाद भागात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांध्ये चकमक झाली. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यांच्या जवळील दोन रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी घराला घेराव घालत कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. मात्र, या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. गोळीबारानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद​