त्रालमध्ये गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्यानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यात या वर्षात सुमारे 102 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलेले आहे.

जम्मू - दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. 

त्रालमधील सतूरा भागातील जंगलात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शनिवार) चकमक झाली. सतूरा जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवान, पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांकडून आज (शनिवार) पहाटे कारवाई करण्यात आली. बराच वेळ चाललेल्या चकमकीनंतर दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्यानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यात या वर्षात सुमारे 102 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलेले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये काश्मीर खोऱ्यात गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :