वजन कमी करा अन् बोनस मिळवा; कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर

झेरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी जागतिक आरोग्य दिनी कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली.
 Zerodha CEO, Nithin Kamath
Zerodha CEO, Nithin Kamathsakal

वर्क फ्रॉम होम आता खुप कॉमन झाले आहेत.त्यामुळे सर्वांना एका ठिकाणी बसून काम करावे लागत आहे. आता यातच “बसणे हा नवीन स्मोकींगचा प्रकार आहे." असे बोलले जाते. बसून काम करत असल्याने शरीरावर त्याचा परिणाम होऊन वजन वाढण्याची शक्यता असते. यातच झेरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी ज्यांनी जागतिक आरोग्य दिनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आकर्षक ऑफर जाहीर केली. (Zerodha CEO promises bonus to employees who lose weight)

कामथ यांनी वजन कमी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनसचे आश्वासन दिले. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका केली जात आहे.

 Zerodha CEO, Nithin Kamath
Video: चैत्र नवरात्रीनिमित्त झंडेवालान मंदिरातील आरती

कामथ यांच्यानुसार, ही ऑफर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणार. ऑफरप्रमाणे,ज्या कर्मचाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) २५ पेक्षा कमी आहे त्यांना बोनस म्हणून अर्ध्या महिन्याचा पगार मिळेल. शिवाय, जर सर्व कर्मचार्‍यांचा एकत्रित BMI 25 पेक्षा कमी असेल, तर प्रत्येकजण बोनस म्हणून आणखी अर्ध्या महिन्याच्या पगारासाठी पात्र असणार.

 Zerodha CEO, Nithin Kamath
गांधींबाबत बेताल बोलणारा कालीचरण म्हणतो, 'मला त्याबाबत पश्चात्ताप...'

कामथने इतर कंपन्यांना आरोग्य-तंत्रज्ञानचे उद्दीष्ट समोर ठेऊन आव्हान केले. कामथ ट्वीटद्वारे म्हणतात, “BMI हा आरोग्य आणि फिटनेसचा मागोवा घेण्यासाठी सर्वोत्तम उपाय नसला तरी, तो निश्चितपणे सुरवात करण्याचा एक मार्ग आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज 10,000 पावले चालण्याचे सुचवून ट्विट थांबवतो.

 Zerodha CEO, Nithin Kamath
धक्कादायक! IndiGo एअर होस्टेससोबत प्रवाशांचे गैरवर्तन

कामथ यांनी शेअर केलेल्या ट्विटवर नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी या कल्पनेवर टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com