अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 18 ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

काबूल (अफगाणिस्तान): पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जण ठार झाले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी आज (शनिवार) दिली.

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजिब दानिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोस्ट प्रांतात असलेल्या अमेरिकेच्या सुरक्षा दलाला लक्ष्य करून मोटारीद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोटानंतर एकच खळबळ उडाली होती. परिसर ताब्यात घेण्याच आला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अद्याप कोणत्याही दहशतावादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली नसली तरी तालिबान या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याची शक्यता आहे. रमदान या सणाच्या पहिल्या दिवशी हा हल्ला झाला आहे, असेही दानिश यांनी सांगितले.

ताज्या बातम्याः