इसिसच्या 111 संशयित दहशतवाद्यांना तुर्कीने घेतले ताब्यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

या कारवाईमध्ये 1500 पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. तुर्कीच्या सर्व सुरक्षा यंत्रणांच्या साह्याने 250 ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली.

इस्तंबुल : दहशतवादाविरोधात मोठी धडक कारवाई करत तुर्की पोलिसांनी इस्लामिक स्टेट तथा इसिस या दहशतवादी संघटनेच्या 111 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या या सर्वांचा इसिसशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील 245 जणांना अटक वॉरंट बजावण्यात आले आल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली. 

कुख्यात दहशतवादी संघटना इसिस जगभरात आपल्या दहशतवादाचे जाळे पसरवत आहे. या संघटनेच्या माध्यमातून असंख्य दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर तुर्की सरकारने धडक कारवाई करत इसिसशी संबंधित 100 हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईमध्ये 1500 पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. तुर्कीच्या सर्व सुरक्षा यंत्रणांच्या साह्याने 250 ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. मात्र, याबाबत सविस्तर तपशील उपलब्ध होऊ शकला नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे आणि संघटनेशी संबंधित काही साहित्य संशयितांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
 पोलिसांनी वायव्येकडील शहरातील बुर्सा येथून 27 संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील काही लोक इस्लामिक स्टेटच्या सीरियातील संघटनेशी संबंधित असल्याची माहिती वृत्तसंस्थेकडून देण्यात आली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news turkey detains over hundred isis members