कोकणच्या विकासाला एक लाख कोटींचे पॅकेज देणार : गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या शेवटच्या चार टप्प्यातील कामाच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणला पुढील तीन वर्षात एक लाख कोटींचे पॅकेज दिले जाईल, अशी घोषणा केली. कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या शेवटच्या चार टप्प्यातील कामाच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणला पुढील तीन वर्षात एक लाख कोटींचे पॅकेज दिले जाईल, अशी घोषणा केली. कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या शेवटच्या चार टप्प्यातील कामाचे भूमिपूजन आज (शुक्रवार) झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, चंद्रकांतदादा पाटील, दीपक केसरकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, राजन तेली, प्रमोद जठार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,"मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रत्यक्षात येत आहे. ते पाहून आनंद झाला. यापूर्वी देशात पाच लाख अपघात होत होते. त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होत होता. त्यामुळे देशातील महामार्ग रुंद करण्याचा निर्णय मी घेतला. यापूर्वी दिवसाला दोन किलोमीटर रस्त्याचे काम केले जात होते. मी जबाबदारी स्विकारल्यानंतर दिवसाला 23 किलोमीटरपर्यंत रस्ते निर्माण करण्यात येत आहेत. मात्र आता दीीराज 40 किलोमीटरपर्यंत रस्त्या उभारण्याचे काम करायचा मानस आहे. भविष्यात अपघातामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.'

गडकरी पुढे म्हणाले, "यापूर्वीच्या सरकारकडून पनवेल ते इंदापूर महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते; मात्र दुर्दैवाने ते काम पूर्ण झाले नाही. अर्धवट राहिले. परंतु मी मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते काम पूर्ण कसे होईल, यासाठी प्रयत्न केला. 2018 पर्यंत संपूर्ण महामार्ग चौपदरीकरण करण्याचा आपला मानस आहे; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेली जागा संपादित करून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री व येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. भविष्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना तो थेट गोव्यापर्यंत होण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी 18 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबईसह कर्नाटकातील आणि गोव्यात येणारे पर्यटकसुद्धा कोकणात यावेत हा यामागचा उद्देश आहे. ग्रीन एर्व्हारमेंट म्हणून कोकणाला जगात ताकद निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे.'गडकरी पुढे म्हणाले, "विकास आणि पर्यटनाचा समतोल राखून कोकणातील बंदरांचा विकास करण्यात येणार आहेत. रस्ते जोडण्यात येणार आहेत. वीज व इथीनॉलवर चालणाऱ्या बसेस सुरू करण्याचा त्या ठिकाणी मानस आहे. जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग व्हावा ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. त्यांनी अनेकवेळा तशी ती बोलून दाखविली होती. महाराष्ट्रात मंत्री असताना मला ते शक्‍य झाले नाही; मात्र आज त्यांची इच्छा पूर्ण केली.'

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर मुंबई कोकणाच्या अत्यंत जवळ येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोकणाचा विकास होणार आहे. शिवसेना-भाजप सरकार कोकणच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील राहिले आहे. येथील पर्यावरण आणि निसर्गाची सांगड घालून कोकणाचा विकास करण्याचा आमचा मानस आहे.' यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, "हा महामार्ग व्हावा अशी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांचे कोकणावर प्रेम होते. अनेक मंत्री आले. कोकणचा कॅलिफोर्निया करू अशी त्यांनी वारंवार घोषणा केली; परंतु त्यांना काही शक्‍य झाले नाही. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबईसारखा मुंबई-कोकण सहज शक्‍य होणार आहे. गडकरी यांच्या प्रयत्नामुळेच अनेक वर्षे रखडलेला महामार्ग आज मार्गी लागला. परंतु भविष्यात कोकणाचा विकास करताना कोकणच्या लोकांना त्याचा फायदा होईल, यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा उपरे येतील आणि उरावर बसतील अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आताच याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे. विकासाच्या मुद्दयांसाठी जिल्ह्यातील सर्व नेते एकाच छताखाली आले ही चांगली गोष्ट आहे.'

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
चित्रपट निर्मात्याविरोधात नीरजा भनोतचे कुटुंबीय न्यायालयात
औरंगाबादेत पेट्रोलपंपावर छापे; वैधमापनशास्त्र पथकाकडून मोजमाप
बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे 'धोंडी धोंडी कर्ज दे' आंदोलन
धुळे : कर्मचाऱ्यांची वाट पाहता स्वच्छता करण्याचा तरुणांचा निर्धार!
डोंबिवलीत कामगाराला आले 62 हजार रुपये वीजबिल
आर्ची-परशा, सचिन-सुप्रिया, अशोकमामा येणार 'ई सकाळ'वर लाईव्ह
सोलापूरमध्ये वीजबिल भरणा केंद्रे सुटीतही राहणार सुरू
‘नकुशी’मध्ये होणार उषा नाडकर्णी यांची एंट्री
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलमध्ये 'एरर'
'कष्टकरी व सरकारी कर्मचाऱयांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज'