आंबोलीचे पर्यटन सायंकाळी सहानंतर बंदः समाधान चव्हाण

अमोल टेंबकर
गुरुवार, 22 जून 2017

अनुचित प्रकार तसेच शिकार रोखण्यासाठी वनविभागाचा निर्णय

सावंतवाडीः आंबोली येथील वर्षा पर्यटन सायंकाळी सहानंतर बंद करण्याचा निर्णय वनविभागाकडून घेण्यात आला आहे. तसेच जंगलातील शिकार रोखण्यासाठी रात्रीच्यावेळी जंगलात फिरणार्‍यांना अटकाव केला जाणार आहे, अशी माहीती येथील वनविभागाचे उपवसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.

दरम्यान वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून येथील वनविभाग काम करणार आहे. त्यासाठी येत्या काळात वनविभागासह ग्रामस्थ अधिकारी संस्था यांच्यामाध्यमातून जिल्ह्यातील एक लाख साठहजार झाडे नव्याने लावण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी सांगितले.

श्री. चव्हाण यांनी आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमिवर माहीती दिली. ते म्हणाले, “जंगलात सायंकाळी सहानंतर फिरू नये असा कायदा आहे. त्यांची अमंलबजावणी आंबोलीत वर्षा पर्यटना दरम्यान करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शिकारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हा मार्ग अवंलबिण्यात आला आहे. त्याच बरोबर सायंकाळी सहानंतर जे कोणी पर्यटक अथवा व्यक्ती जंगल परिसरात फिरताना दिसतील त्यांना सुध्दा अटकाव करण्यात येणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “येथील वर्षा पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची सोय व्हावी यासाठी धबधब्याच्या परिसरात चेंजीग रुम उभारण्यात येणार आहे. त्याच बरोबर कचरा टाकण्यासाठी डस्टबिनची सोय करण्यात येणार आहे. परिसरातील कचर्‍याचे प्रमाण कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”

श्री चव्हाण म्हणाले, “वृक्ष लागवडीचे जिल्ह्यासाठी एक लाख साठ हजाराचे उद्दिष्ट आहे. त्यातील जास्तीत जास्त उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यात वनविभागाकडुन 41 हजार, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 52 हजार, सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून 23 हजार तर अन्य संस्था, मंडळे, लोकप्रतिनीधी यांच्या माध्यमातून 60 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. लाकुड व्यावसायिक शेतकरी बागायदार यांचे सुध्दा या मोहीमेसाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. यात साग, बाभूळ या सारख्या झाडाबरोबर काजू आंबा आदी झाडे लावण्यात येणार आहेत.”

धबधबे पुर्नजिवीतसाठी वनविभाग अनभिज्ञ
आंबोली येथील वर्षा पर्यटन वाढविण्यासाठी परिसरात असलेले छोटे धबधबे पुर्नजिवीत करण्याबरोबर जोडण्याचा मानस पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करुन दाखविला होता. त्यासाठी साठ लाख रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले होते; मात्र याबाबत श्री. चव्हाण यांना विचारले असता ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसले. तसा प्रस्ताव अद्याप पर्यत आमच्याकडे आला नाही, असे त्यांनी सांगितले.