सावंतवाडीः निरवडे भंडारवाडी घराला आग लागून वीस लाखाचे नुकसान

अमोल टेंबकर
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

सावंतवाडी : निरवडे भंडारवाडी येथे संजय अंकुश बागवे यांच्या घराला आग लागून सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे. आज (सोमवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला पण अपयश आले. आगीत बागवे यांचे सर्वकाही जळून खाक झाले आहे.

गावचे जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, काँग्रेसचे काँग्रेसचे प्रमोद गावडे यांनी  घटनास्थळी धाव घेत संबधित कुंटूबियांना धीर दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. बागवे येथील भंडारवाडी भागात राहतात. आज सकाळी ते नेहमी प्रमाणे घरातील कामे करीत असताना घराचे वासे पेटताना दिसले. दरम्यान, ते आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात असताना आगीने रौद्र रूप धारण केले. बागवे यांनी आरडाओरड करत आपल्या पत्नीसह दोघा मुलांना बाहेर काढले. काही साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही वस्तू  मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना अन्य वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही वेळात घरातील घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.

आग लागल्याचे कळताच गावातील ग्रामस्थांनी यांच्याकडे धाव घेतली. बादल्या कळशी आदी साहित्य घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व काही खाक झाले आहे. आगीची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद गावडे यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार लागलेल्या आगीत बागवे यांच्या घरातील कपडे, टीव्ही फ्रीज अशा जीवनावश्यक वस्तूंचा सर्व काही जळून खाक झाल्या आहेत. याची माहिती मिळताच तलाठी व महसूल प्रशासनाने त्यांच्या घराकडे धाव घेतली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई