आदिवासी वृद्ध महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

अमित गवळे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पाली (रायगड): सुधागड तालुक्यात एका आदिवासी वृद्ध महिलेचा खून झाला आहे. पुई गावच्या हद्दीत नितीन यादव यांच्या शेतात गुरुवारी (ता. ९) महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला.

पाली (रायगड): सुधागड तालुक्यात एका आदिवासी वृद्ध महिलेचा खून झाला आहे. पुई गावच्या हद्दीत नितीन यादव यांच्या शेतात गुरुवारी (ता. ९) महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला.

याबाबत ईश्वर श्रावण हिलम याने पाली पोलिस स्थानकांत फिर्याद दिली आहे. पार्वती उर्फ सावित्री श्रावण हिलम (वय 65) राहणार वावळोली आदिवासीवाडी असे मृत महिलेचे नाव आहे. हि महिला येथील बल्लाळेश्वर मंदिर परिसरात भिक्षा मागत असे. बुधवारी ती नेहमी प्रमाणे तिच्या घरी आली नाही, त्यामुळे तिच्या मुलाने शोधा शोध सुरु केली. यावेळी पई गावचे पोलिस पाटील सुधीर महाले यांनी मृत महिलेच्या घरी जावून या घटने संदर्भात माहीती दिली. सावित्री हिलम यांना पुई गावच्या हद्दीत नितीन यादव यांच्या शेतात आणून ठार मारले. सावित्री हिलम यांच्या चेहर्यावर जखमा झाल्या आहेत. तसेच त्यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला असून, अंगावरील कपडे बाजूला टाकण्यात आले होते. त्यांच्यावर शारीरक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे. अधिक तपासासाठी महिलेचा मृतदेह अलिबाग येथी शासकिय रुग्णालया पाठविण्यात आला आहे.

याप्रकरणी पाली पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस अधिक्षक अनिल पारसकर व पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड (रोहा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दशरथ पाटील करीत आहेत.