रोहित शर्मा टी-20 चा नवा 'बादशहा'; किंग कोहलीलाही टाकलं मागे

IND vs SL Rohit Sharma breaks Martin Guptill record
IND vs SL Rohit Sharma breaks Martin Guptill record Sakal

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांना ओव्हरटेक करत नंबर वनवर कब्जा केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हा खास पल्ला गाठण्यासाठी त्याला अवघ्या 37 धावांची आवश्यकता होती. 37 वी धाव घेताच तो टी-20 मधील बादशहा झाला आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

• रोहित शर्मा- 123 सामने 3300 धावा (मैच जारी)

• मार्टिन गप्टिल- 112 सामने, 3299 धावा

• विराट कोहली- 97 सामने, 3296 धावा

IND vs SL Rohit Sharma breaks Martin Guptill record
Cricket Record : एलेक्स कॅरीचा वर्ल्ड रेकॉर्ड, पंतला टाकलं मागे

सर्वाधिक षटकारांचाही विक्रम रोहितच्या नावे

टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचण्यासोबतच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही आपल्या नावे केलाय. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 32 चेंडूत 44 धावा करणाऱ्या रोहितनं आपल्या इनिंगमध्ये 2 उत्तुंग षटकार खेचले. या षटकारासर त्याच्या खात्यात 15 षटकारांची नोंद झाली आहे. या यादीत कुशल परेरा 14 षटकारांसह दुसऱ्या तर शिखर धवन 12 षटकारासह तिसऱ्या स्थानावर आहे.

IND vs SL Rohit Sharma breaks Martin Guptill record
युक्रेनमध्ये बॉम्बिंग; भारतीय पॅरालिम्पिक मेडलिस्ट चिंतेत

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने ईशान किशनच्या साथीनं डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी रचली. अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना लाहिरु कुमारा याने रोहितला त्रिफळाचित केले. 123 टी सामन्यातील 115 डावात रोहित शर्माच्या खात्यात 3307 धावा जमा झाल्या आहेत. त्याने टी-20 मध्ये 4 शतक आणि 26 अर्धशतक झळकावली आहेत. विराट कोहलीनं वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यानंतर विश्रांती घेतली होती. त्याच्या अनुपस्थितीत अव्वलस्थान मिळवल्यानंतर कोहलीकडून त्याला तगडी फाईट मिळू शकते. टी-20 मध्ये या दोघांच्यात खरी टक्कर असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com