राजकारणात धूर्त असणाऱ्या व्यक्तीला चाणक्य का म्हणतात?

चाणक्य कोण होते, हे तुम्ही आधी समजून घेणे गरजेचे आहे.
चाणक्य
चाणक्यसकाळ

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेग आलाय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. आता शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच पद वाचवायचं असेल तर राज्यात फक्त एकच व्यक्ती वाचवू शकतो, असे म्हटले जाते. त्या व्यक्तीला चाणक्य म्हणून खास ओळख आहे. (Maharashra politics)

होय. चाणक्य संबोधले जाणारं चर्चेत असलेलं नाव म्हणजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार. शरद पवार यांच्या शिवाय विधानपरीषद आणि राज्यसभा निवडणूकीत आपला डंका वाजवणारे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा चाणक्य संबोधले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, राजकारणात धूर्त असणाऱ्या व्यक्तीला चाणक्य का म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी चाणक्य कोण होते, हे तुम्ही आधी समजून घेणे गरजेचे आहे. (do you know why sharad pawar and devendra fadanvis called as chanakya in politics)

चाणक्य
'हिंदुत्व.. हिंदुत्व म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी आहेत'

जेव्हा संपूर्ण जग राजेशाही संस्कृतीचे वाहक होते. लोकशाहीचा विचारही कोणी करू शकत नव्हता त्यावेळी सुमारे 2300 वर्षांपूर्वी त्यांनी असे राज्य स्थापण केले की जिथे लोकशाही महत्वाची आहेत. मौर्य वंशाची स्थापना करून भारतापेक्षा कितीतरी मोठ्या क्षेत्रफळाचे मगध साम्राज्य स्थापन केले. म्हणूनच मगधचा इतिहास हा विशेष प्रसिद्ध आहे. अर्थशास्त्रासारख्या राजकारणावर महत्त्वाचा ग्रंथ रचून त्यांनी जगात आपले नाव अजरामर केले.याशिवाय त्यांनी चाणक्य नीति, चाणक्य सूत्र असे अनेक ग्रंथ लिहिले. आजही कित्येक लोक चाणक्य नितीला फॉलो करतात.

चाणक्य
Sanjay Raut यांनी बंडखोर आमदारांवर टीका केल्यानंतर मनसेनी त्यात उडी घेतली

मगधच्या उत्तरेकडील सीमेवर भागीरथी गंगेच्या दक्षिणेकडील तीरावर असलेल्या पाटलीपुत्रनगरच्या चकाराम गावात एक झोपडी होती, जिथे कौटिल्य गोत्रात जन्मलेल्या ब्राह्मणांचे वास्तव्य होते. विद्वान असूनही गरीब होते. इसवी सन पूर्व चौथ्या शतकात भाद्रपद अमावस्येला त्यांच्या घरी एक मूल जन्माला आले.

जन्मताच त्याचे दोन दात गोठले होते. कौटिल्य कुळात (गोत्र) जन्माला आल्याने वडील चणक यांनी मुलाचे नाव कौटिल्य ठेवले. त्यामुळे चणक आणि त्याच्या पत्नीला मगधचा जुलमी राजनंद याने बंदिवान म्हणून नेले. त्यानंतर चणकची हत्या केली जाते. जेव्हा कौटिल्य गंगेच्या काठी पाटलीपुत्र शहरात येतो तेव्हा तिथे असलेल्या स्मशानभूमीत त्याला फक्त त्याच्या वडिलांचे शीर सापडते. आई केव्हा मृत्यू पावली याबद्दल माहिती नाही.

चाणक्य
आज बाळासाहेबांची आठवण येते; सुप्रिया सुळेंचं भावूक विधान

स्मशानभूमीपासून काही अंतरावर पश्चिम गंगेत स्नान करून पित्याचे चाणक्य अंतिमस्ंकार करतो. आणि त्यावेळी शपथ घेतो की जोपर्यंत अत्याचारी नंदाकडून त्याच्या वडिलांचा बदला घेत नाही तोपर्यंत मी अग्नीत शिजवलेले कोणतेही अन्न खाणार नाही.

याच्या स्मरणार्थ पटना येथील गंगेच्या काठावर कुशी मेळा भरवला जातो. हा कार्यक्रम भादव अमावस्येला केला जातो. या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या दैनंदिन कामासाठी कुश उपटतात. हा कुश एक वर्ष पवित्र राहतो. यज्ञादीमध्ये या कुशाचा विशेष वापर केला जातो.

चाणक्य
Maharashtra Politics LIVE: राष्ट्रवादीने सेना फोडण्याचा तीनदा प्रयत्न केला-केसरकर

चाणक्य आपल्या नितीने जुलमी राजनंद याचे राज्य हेरावून मौर्य वंशाची स्थापना करतो आणि हूशारीने चंद्रगुप्तला मदत करतो. आजही मगध येथे चाणक्यने सत्तांतर करण्यासाठी जी निती वापरली , त्या चाणक्य नितीची चर्चा होते आणि हीच निती शक्यतो शरद पवार सारखे दिग्गज नेते वापरतात अनेकदा दिसून आले त्यामुळे त्यांना चाणक्य म्हणणे, अगदी साहजिकच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com