कोपर्डी खटला : न्यायालयातील 'ती' पाच मिनिटे...

Kopardi Court Ujjwal Nikam Ahmednagar district Kopardi case Kopardi rape and murder Maharashtra
Kopardi Court Ujjwal Nikam Ahmednagar district Kopardi case Kopardi rape and murder Maharashtra

नगर : साडेआकरा वाजता विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश सुवर्णा केवले कक्षात आल्या. आरोपीचे वकील आलेले नसल्याने दोनदा त्यांच्या नावे पुकारा दिला. पाच मिनिटांत पुकारा देऊनही आरोपीचे वकील आले नाहीत. न्यायाधिशांनी अकरा वाजून पस्तिस मिनिटांनी आरोपीला समोर बोलावून घेतले. वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन वेळा जन्मठेप, एकदा फाशीची शिक्षा सुनावली. लोकांनी टाळ्या वाजल्या; पण आरोपीचे चेहरे मात्र निर्विकार दिसले. पश्‍चातापाचे भाव उमटून दिसत होते. 

राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून केलेल्या खटल्याचा आज निकाल लागला. निकाल प्रक्रियेला अकरा वाजता सुरवात होणार असली तरी सकाळी साडेनऊपासूनच न्यायाधिश सुवर्णा केवले यांच्या कक्षात गर्दी जमली होती. अकरा वाजेपर्यत कक्षात बसायला जागीही उरली नव्हती. पोलिस, शिघ्र कृती दलाच्या जवानांनी कक्षात बंदोबस लावला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आकरा वाजून पाच मिनिटांनी आगमन झाले.

अकरा वाजून 32 मिनिटांनी न्यायाधिश सुवर्णा केवले यांचे आगमन झाले. पाच मिनिटांत आरोपीला समोर बोलावले, क्रमाने उभे करुन कलम निहाय शिक्षा सांगितली. तिघेही आरोपी शांतपणे शिक्षा एकून घेत होते.

मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे सांगताच न्यायकक्षातच टाळ्या वाजल्या गेल्या. आरोपीचे चेहरे मात्र निर्विकार होते. पश्‍चातापाचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. आरोपी नितीन भैलुमेच्या डोळ्यात पाणी दिसले. फाशीची शिक्षा झाल्याचे स्पष्ट होताच मुलीच्या आईसह कक्षात असलेल्या महिलांनाही रडू कोसळले. 

फाशीची शिक्षा झाल्याचे न्यायालय परिसरात काही मिनिटातच कळले. मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी "एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी सुरु केली. उज्ज्वल निकम न्यायालयाच्या परिसरात येताच त्यांना प्रसारमाध्यमे आणि लोकांचा गराडा पडला.

पिडीतेचे आई-वडील नातेवाईक सगळे बरोबरच होते. न्यायालयाच्या परिसरात येताच त्यांनी लोकांचा आणि प्रसार माध्यमाचा गराडा पडला. त्यांनी प्रतक्रिया विचारल्या जात असताना आई, बहिन आणि महिला नातेवाईकांना रडू आवरत नव्हते. निकाल जाहीर झाल्यावरही सुमारे दोन तास लोकांची न्यायालयाच्या परिसरात गर्दी कायम होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com