'ई-चालान'चा दंड भरण्याची नोटीस! 80 लाख वाहनांवर 997 कोटींचा दंड

अनेकवेळा संबंधित वाहनधारक त्या रस्त्यावरून अथवा महामार्गावरून गेलेला नसतानाही त्याच्या वाहनाला ई-चालानद्वारे दंड केला जातो, अशा तक्रारींत वाढ झाली आहे. अशा तक्रारींवर ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने तोडगा काढला जात आहे. mahatraffic वरुन E-Challan grievance यावर संबंधितांनी त्याच्याकडील पुरावे जोडून अर्ज करावा, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
तुमच्या वाहनावर दंड आहे का?
तुमच्या वाहनावर दंड आहे का?esakal

सोलापूर : बेशिस्त वाहतुकीला लगाम लागावा, रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्याच्या हेतूने 2019 पासून ई-चालान ही नवी कार्यप्रणाली परिवहन विभागाने आणली. महामार्गांवर इन्टरसेप्टर वाहने लावली जातात आणि त्यांच्याकडून लेन कटिंग, ओव्हरस्पीड, विनाहेल्मेट, अशा विविध नियमांअंतर्गत बेशिस्त वाहनांना दंड आकारला जातो. दंड न भरणाऱ्यांविरुध्द न्यायालयात खटले दाखल होत आहेत. त्यासंदर्भात उद्या (शनिवारी) लोकअदालतीचे आयोजन केले आहे. अनेकांना त्यासंदर्भातील नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

तुमच्या वाहनावर दंड आहे का?
शिक्षकांची पगार 1 तारखेला नाहीच! बॅंकांचे हप्ते भरायची पंचाईत

ई-चालान सुरु झाल्यानंतर 2019 पासून राज्यातील तब्बल 89 लाख वाहनांना 998 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील जवळपास पावणेनऊ लाख वाहनधारकांनी 43 कोटींचा दंड भरला असून उर्वरित वाहनधारकांनी दंड भरणे अपेक्षित आहे. परंतु, महामार्गावरून ये-जा करताना महामार्ग पोलिसांकडून तर शहरात अथवा तालुक्‍याच्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील स्थानिक व वाहतूक पोलिसांकडून पुन्हा त्याच कारणास्तव दंड आकारला जात आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमतीपेक्षाही काहीजणांचा दंडच अधिक झाल्याची स्थिती आहे. तर अनेकांना चुकीच्या पध्दतीने दंड आकारला गेला आहे. त्या व्यक्‍तीचे वाहन त्याठिकाणी गेले नसतानाही अनेकांना दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे ई-चालानद्वारे दंड आकारणी झाल्यानंतर तो कोणत्या कारणास्तव व कुठे कारवाई झाली, याची माहिती संबंधित वाहनचालकाला मिळावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

तुमच्या वाहनावर दंड आहे का?
नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर! प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद?

सोलापुरातील दोन लाख वाहनांवर दंड
सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी जवळपास दोन लाख बेशिस्त वाहनांवर ई-चालानद्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांनी एक कोटी 10 लाखांपर्यंत दंड भरणे अपेक्षित आहे. दंड न भरल्यास त्यांचे वाहन पुन्हा कारवाईत पकडल्यास ते जप्त होऊ शकते. तसेच त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी लोकअदालत अथवा दंड झाल्याचा मेसेज आल्यांनतर ती रक्‍कम ऑनलाइन भरावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त दिपक आर्वे यांनी केले आहे.

तुमच्या वाहनावर दंड आहे का?
माजी मंत्री ढोबळे म्हणाले, जयंत पाटील यांच्या दारावरून गेलो तरी डायबेटिस होतो

चुकीची दुरुस्ती अशी करता येईल
अनेकवेळा संबंधित वाहनधारक त्या रस्त्यावरून अथवा महामार्गावरून गेलेला नसतानाही त्याच्या वाहनाला ई-चालानद्वारे दंड केला जातो, अशा तक्रारींत वाढ झाली आहे. संबंधित वाहनधारकाकडील वाहन दुचाकी असतानाही त्यांना चारचाकीचा दंड, त्या क्रमांकाचे वाहन नसतानाही त्या वाहनधारकाला त्याचा दंड, अशा तक्रारींवर ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने तोडगा काढला जात आहे. mahatraffic वरुन E-Challan grievance यावर संबंधितांनी त्याच्याकडील पुरावे जोडून अर्ज करावा, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

तुमच्या वाहनावर दंड आहे का?
गोड उसाची कडू कहाणी! जगाच्या पोशिंद्याचीच उदरनिर्वाहासाठी धडपड
  • ठळक बाबी...
    - बेशिस्त वाहतुकीला स्वंयशिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत म्हणून 2019 पासून ई-चालानची सुरवात
    - शहर-ग्रामीण असो वा राष्ट्रीय महामार्गावरून जाताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांना केला जातो ऑनलाइन दंड
    - आतापर्यंत 80 लाख 70 हजार 811 वाहनांना ई-चालानद्वारे आकारला दंड
    - पावणेनऊ लाख वाहनधारकांनी भरला 43 कोटींचा दंड; 72 लाख वाहनधारकांनी दंड भरलेला नाही
    - उद्या (शनिवारी) राज्यभर लोकअदालत; न्यायालयात खटला दाखल होऊ नये म्हणून दंड भरणे बंधनकारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com